हॉलिवूडच्या वॉक ऑफ फेमध्ये दीपिकाला स्थान
दीपिका पदूकोन ही बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. याचबरोबर दीपिका जागतिक स्तरावरही ओळख प्राप्त करून आहे. दीपिकाला आता हॉलिवूड वॉक ऑफ फेम सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. याचबरोबर हा सन्मान मिळविणारी दीपिका पहिली भारतीय कलाकार ठरणार आहे. हॉलिवूडमध्ये एका पत्रकार परिषदेत माइली सायरस, टिमोथी चालमेट आणि अन्य जागतिक कलाकारांच्या नावांसाब्sात या सन्मानासाठी दीपिकाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. हॉलिवूड अभिनेत्री एमिली ब्लंट, फ्रेंच अभिनेत्री कोटिलार्ड, कॅनेडियन अभिनेत्री रेचल मॅकएडम्स, इटालियन अभिनेत्री फ्रेंको नीरो आणि सेलिब्रिटी शेफ गॉर्डन रामसे यांनाही हॉलिवूड वॉक ऑफ स्टारने सन्मानित करण्यात येणार आहे.
हॉलिवूड वॉक ऑफ फेम कॅलिफोर्नियातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. 15 ब्लॉकच्या या ठिकाणात आतापर्यंत 2500 हून अधिक कलाकारांची नावे जोडण्यात आली असून आता यात दीपिकाचा समावेश झाला आहे. या प्रसिद्ध पर्यटनस्थळी लाखोंच्या संख्येत पर्यटक येत असतात. दीपिकाने 2017 साली ट्रिपल एक्स : रिटर्न ऑफ जेंडर केज चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. विन डीजलसोबत तिने स्क्रीन शेअर केली होती. तिने मागील काही वर्षांमध्ये मेट गाला आणि कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्वत:च्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.