महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

दीपिका कुमारी पदकाविना परत

06:10 AM May 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ येचेऑन, द.कोरिया

Advertisement

भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारीला आंतरराष्ट्रीय पुनरागमनात विश्वचषक तिरंदाजी स्टेज 2 स्पर्धेत रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. तिला रविवारी जागतिक द्वितीय मानांकित लिम सिह्योऑन व जागतिक तिसऱ्या मानांकित अलेजांद्रो व्हॅलेन्सिया यांच्याकडून तिला पराभव पत्करावा लागला.

Advertisement

यामुळे रिकर्व्ह विभागात भारताला एकही पदक मिळविण्यात अपयश आले. मात्र कंपाऊंड विभागात भरताने एक सुवर्ण व एक रौप्य अशी दोन पदके मिळाली. भारताने सांघिक प्रकारात सुवर्ण व मिश्र सांघिकमध्ये रौप्यपदक मिळविले. या तिरंदाजांना दीपिका कुमारी वगळता अन्य एकालाही पदकाच्या फेरीत प्रवेश मिळविता आला नाही. कोरियाच्या 20 वर्षीय लिमने उपांत्य फेरीच्या लढतीत दीपिकावर 6-2 (28-26, 28-28, 28-27, 27-27) अशी मात केली. एका महिन्याच्या कालावधीत लिमने दीपिकावर मिळविलेला हा दुसरा विजय आहे. गेल्या महिन्यात शांघायमधील वर्ल्ड कप स्टेज 1 स्पर्धेत सरळ सेट्समध्ये हरविल्याने दीपिकाला रौप्य मिळाले होते.

येथील उपांत्य लढतीत दीपिकाने तीनदा लाल सर्कलमध्ये तीर मारत तीनदा आठ गुण मिळविले, त्याचा फटका तिला बसला. पहिल्या, तिसऱ्या व चौथ्या सेटमध्ये तिने हे गुण मिळविल्यानंतर लिमने चार सेटमध्येच विजय मिळविला. त्यानंतर झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत दीपिका व्हॅलेन्सियाकडून 4-6 (26-29, 26-28, 28-25, 27-25, 26-29) अशी पराभूत झाली. आता जूनमध्ये दीपिका वर्ल्ड कप स्टेज 3 मध्ये भाग घेणार आहे. ऑलिम्पिक पात्रता मिळविण्याची ही शेवटची संधी आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article