महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

दीपिका कुमारी, ज्योती-अभिषेक अंतिम फेरीत

06:55 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारताला चार सुवर्ण मिळविण्याची तर दीपिकाला हॅट्ट्रिकची संधी

Advertisement

वृत्तसंस्था/ शांघाय

Advertisement

भारताची माजी अग्रमानांकित तिरंदाज दीपिका कुमारीने येथे सुरू असलेल्या वर्ल्ड कप स्टेज 1 तिरंदाजी स्पर्धेत कोरियाच्या जेऑन हुनयंगचे आव्हान संपुष्टात आणत महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकाराची उपांत्य फेरी गाठली तर कंपाऊंड तिरंदाजांनी चमकदार प्रदर्शन करीत भारताचे चौथे पदक निश्चित केले आहे.

महिलांच्या दीपिकाने उपांत्यपूर्व फेरीत 1-3 ची पिछाडी भरून काढत हुनयंगवर 6-4 (27-28, 27-27, 29-28, 29-27, 28-28) अशी मात करून शेवटच्या चार फेरीत प्रवेश मिळविला. सुवर्णपदकासाठी दीपिकाला आता आणखी दोन कोरियन खेळाडूंना हरविण्याची किमया साधावी लागणार आहे. उपांत्य फेरीत तिची लढत कोरियाची युवा खेळाडू नाम सुहयेऑनशी होणार आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात अग्रमानांकित 20 वर्षीय कोरियाची लिम सिहयेऑन व चीनची लि जियामन यांच्यात मुकाबला होणार आहे.

ज्योती, अभिषेक वर्मा अंतिम फेरीत

 

ज्योती सुरेखा व्हेन्नम व अभिषेक वर्मा यांनी मिश्र कंपाऊंड सांघिक विभागात अंतिम फेरी गाठत भारताचे चौथे पदक निश्चित केले. जागतिक द्वितीय मानांकित भारतीय जोडीने मेक्सिकोच्या आंद्रेया बेसेरा व लॉट मॅक्झिमो मेन्डेझ ऑर्टिझ यांच्यावर 155-151 अशी मात केली. सुवर्णपदकासाठी त्यांची लढत इस्टोनियाच्या जोडीशी शनिवारी होईल. ज्योती कंपाऊंड संघाचीही सदस्य असून महिला संघाने याआधीच अंतिम फेरी गाठली आहे. याशिवाय ज्योतीने वैयक्तिक विभागातही उपांत्य फेरी गाठली असल्याने ती पदकांची हॅट्ट्रिक करण्याच्या मार्गावर आहे. भारतीय तिरंदाजांनी एकूण चार प्रकारात अंतिम फेरी गाठली असून ते सर्व सांघिक विभागातील आहेत. याशिवाय वैयक्तिक कंपाऊंडमध्ये ज्योती व प्रियांश यांनी उपांत्य फेरी गाठत दोन पदके निश्चित केली आहेत. सांघिक कंपाऊंडमध्ये  पुरुष, महिला व मिश्र विभागात तर रिकर्व्ह विभागात पुरुष संघाने अंतिम फेरी गाठर्लीं आहे.

अंकिता-धीरज, तरुणदीप राय पराभूत

रिकर्व्ह मिश्र सांघिक प्रकारात भारताच्या अंकिता भगत व धीरज बोम्मदेवरा यांना उपांत्य फेरीत कोरियाच्या लिम व किम वूजिन यांच्याकडून 0-6 असा एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला. आता कांस्यपदकासाठी त्यांची लढत मेक्सिकोच्या संघाशी होईल. रिकर्व्ह विभागात भारताच्या तरुणदीप रायलाही उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला. आंद्रेस टेमिनोकडून त्याला 3-7 असा पराभव स्वीकारावा लागला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article