For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मेटा एआयचा नवा आवाज ठरली दीपिका

06:09 AM Oct 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
मेटा एआयचा  नवा आवाज ठरली दीपिका
Advertisement

दीपिका पदूकोनने स्वत:च्या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर करत आपण मेटा एआयचा नवा आवाज ठरणार असल्याची घोषणा केली आहे. या व्हिडिओच्या दीपिकाच्या चाहत्यांनी जोरदार कॉमेंट्स केल्या आहेत. दीपिका देखील या व्हिडिओत अत्यंत आनंदी दिसून येत आहे. मी मेटा एआयचा नवा आवाज आहे, तुम्ही तयार आहात का, असे या व्हिडिओत ती म्हणताना दिसून येते. यानंतर ती स्वत:च्या आवाजाचे वेगवेगळे नमुने रिकॉर्ड करत असल्याचे दिसून आले. या प्रक्रियेचा दीपिकाने  आनंद घेतला आहे. दीपिकाच्या या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनी रिअॅक्शन्स दिल्या आहेत. एका युजरने ही मोठी गोष्ट असल्याचे म्हटले आहे. तर अन्य युजरने नवा दिवस, नवी कामगिरी अशी टिप्पणी केली आहे.

Advertisement

दीपिका पदूकोन सध्या शाहरुख खानचा चित्रपट ‘किंग’मध्ये काम करत आहे. या अॅक्शन चित्रपटात शाहरुख खानची कन्या सुहाना देखील मुख्य भूमिका साकारत आहे. याचबरोबर दीपिका ही दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनसोबत एका चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एटली करत असून याचे नाव अद्याप ठरलेले नाही.

Advertisement
Advertisement
Tags :

.