दिलजीतच्या लाईव्ह कॉनर्स्टमध्ये दिसली 'दिपीका'
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच चाहत्यांच्या समोर
बेंगलोर :
नुकताच पंजाबी गायक दिलजीत दोसांझ या कलाकाराची लाईव्ह कॉन्सर्ट बेंगलुरू येथे पार पडली. या लाईव्ह कॉन्सर्टला अभिनेत्री दिपीका पदुकोणने हजेरी लावली. दिपीका लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच चाहत्यांच्या समोर आली. तिला पाहिल्यावर कॉन्सर्टमध्ये एकच चर्चा सुरू झाली.
या कार्यक्रमात दिपीका, दिलजीत दोसांज चे गाणी बिनधास्त एन्जॉय करताना दिसली. तिला असे पाहून चाहतेही खूप खुश झाले. दिलजीत दोसांझ चाहत्यांशी संवाद साधत असताना स्टेजच्या मागून दिपीका लपून पाहत होती, तिचे हे काही फोटो व्हायरल झाले.
दिलजीतने तिला चाहत्यांशी संवाद साधायला स्टेजवर बोलवले. यावेळी तिने तिच्या तमाम चाहत्यांशी बेंगलुरूकरांशी संवाद साधला. आणि कॉन्सर्टचा आनंद लुटला.
दिपीका पदुकोण आणि रणवीर सिंग यांना सप्टेंबर महिन्यात कन्याप्राप्ती झाली. त्यांनी तिचे नाव दुआ ठेवले आहे. दुआच्या जन्मानंतर दिपीका पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसली.