कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दीपक पुनिया, उदितला रौप्यपदके

06:40 AM Apr 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप : दिनेशला कांस्य, भारताला एकूण 10 पदके

Advertisement

वृत्तसंस्था/ अम्मान, जॉर्डन

Advertisement

येथे सुरू झालेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या दीपक पुनियाने तिसरे तर एकूण पाचवे रौप्य मिळविले तर उदितलाही सलग दुसऱ्यांदा रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत भारताने एकूण 10 पदके मिळविली.

25 वर्षीय पुनिया पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकला नव्हता. पुनरागमनाच्या लढतीत त्याने 92 किलो वजन गटात कीर्गिझच्या बेकझत रखिमोव्हवर संघर्षपूर्ण विजय मिळविला. रखिमोव्हने त्याला कडवा प्रतिकार केला. पण पुनियाने ही उपांत्यपूर्व लढत 12-7 अशा फरकाने जिंकली. नंतरच्या फेरीत त्याने जपानच्या ताकाशी इशिगुरोवर 8-1 अशी मात करून अंतिम फेरी गाठली. इराणच्या जागतिक अग्रमानांकित अमिरहुसेन बी. फिरोझपूरबांदपेइकडून पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या दोन मिनिटात पुनियाने फारशा हालचाली केल्या नाहीत. त्याला खाली घेतल्यानंतर अमिरहुसेनला दोन गुण मिळाले. पुनियाने अति बचावात्मक खेळ केल्याने तो गुण गमवित राहिला आणि तांत्रिक सरसतेच्या आधारे त्याला पराभव स्वीकारावा लागल्याने रौप्य मिळाले. दीपकने 2021 व 2022 आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्य तर 2019 व 2020 मध्ये कांस्यपदके मिळविली होती.

61 किलो वजन गटात उदितने कीर्गिझच्या बेकबोलोत उलूला 9-6 अशा फरकाने हरविल्यानंतर चीनच्या वानहाओ झोयूवर 2-0 अशी मात करीत अंतिम फेरी गाठली. जेतेपदाच्या लढतीत जागतिक अग्रमानांकित ताकारा सुदाने सिंगल लेग आक्रमण करीत उदितला बाहेर खेचत गुणाचे खाते खोलले. तर उजव्या पायावर आक्रमण करीत खाली घेतल्याने सुदाला आणखी दोन गुण मिळाले. दुसऱ्या फेरीत उदितने आक्रमक धोरण अवलंबताना सुदाच्या पायावर दोनदा हल्ले केले आणि सुदाचा घोटा हाताने पकडला होता. पण सुदाने अप्रतिम बचाव करीत त्यातून सुटका करून घेतली. त्यामुळे उदितला गुण घेण्याची त्याने संधीच दिली नाही. मात्र त्याला संधी मिळाल्यावर त्याने आणखी दोन गुणांची भर घालत सुदाने 5-1 अशी आघाडी घेतली. शेवटचे 11 सेकंद असताना सुदाची दमछाक झाली होती. पण उदितला त्याचा लाभ घेता आला नाही. त्याने केवळ 3 गुण मिळविले आणि त्याला ही लढत 4-6 अशा फरकाने गमवावी लागली. गेल्या वर्षीही उदितला रौप्यपदक मिळाले होते.

मुकुल दाहियाने दोन शानदार विजय मिळवित उपांत्य फेरी गाठल्यानंतर त्याला कांस्य जिंकण्याची चांगली संधी मिळाली हेती. पण त्याला ती साधता आली नाही. सिंगापूरच्या वेंग लुएन गॅरी चौला त्याने एकही गुण न गमविता सहज हरविले होते, त्यानंतर जागतिक द्वितीय मानांकित कीर्गिझच्या मुखम्मद अब्दुल्लाएव्हवर 3-1 अशी मात केली. उपांत्य फेरीत त्याला इराणच्या जागतिक तिसऱ्या मानांकित अबोलफझ्ल वाय. रहमानी फिरोझजाइकडून तांत्रिक सरसतेवर पराभव स्वीकारावा लागला. नंतर कांस्यपदकाच्या लढतीत जपानच्या तात्सुया शिराइकडून त्याला 2-4 अशा फरकाने पराभूत व्हावे लागले.

125 किलो हेविवेट गटात दिनेशने तुर्कमेनिस्तानच्या सापारोव्ह झायामुहम्मतवर चुरशीच्या लढतीत 14-12 असा विजय मिळवित कांस्य पटकावले. 74 किलो गटात जयदीप अहलावतला स्पर्धेच्या सुरुवातीला पराभव स्वीकारावा लागला. जपानच्या हिकारु ताकाताने त्याला 10-5 अशा गुणांनी हरविले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article