दीपक केसरकरांचा सर्वांत मोठ्या मताधिक्याने विजय निश्चित
शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांचा विश्वास
वेंगुर्ले । प्रतिनिधी
आजच्या घडीला एकही गुन्हा नसणे ही एखाद्या राजकीय नेत्याच्या आयुष्यातील खुप मोठी कमाई आहे. राज्यातील सुसंस्कृत नेत्यांमध्ये ज्यांचे आदराने नाव घेतले जाते ते आपल्या मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे विजयाचा चौकार निश्चितच लगावणार आहेत. आपल्या जिल्ह्यातील बॅ. नाथ पै, मधु दंडवते, एकनाथ ठाकुर अशा नेत्यांचा वारसा केसरकर समर्थपणे पुढे चावलत आहेत. मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या जोरावर ते विरोधकांना भारी ठरणार आहेत. कितीही काही झाले तरी या भागातील जनतेचे त्यांच्यावरील प्रेम कमी होणार नाही. त्यामुळे ते या निवडणुकीत आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक मताधिक्य मिळवतील, असा विश्वास वेंगुर्ले तालुका शिवसेना प्रमुख नितीन मांजरेकर यांनी व्यक्त केला आहे.
केसरकर व त्यांचे घराणे यांचे खुप पूर्वीपासून आपल्या भागातील जनतेवर उपकार आहेत. मला आठवतेय आमच्या बालपणी आमच्या घरात विड्या बनविण्याचे काम चालायचे. शेतीतून वर्षभराची रोजीरोटी निघत नसल्याने त्याकाळी अनेकजन केसरकर यांच्या वडिलांच्या विडी कारखान्यावर अवलंबून असायचे. ब्रिटीश राजवटीच्या त्या काळात स्थानिकांवर अमानुष अन्याय होत असेत. संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या धगधगत्या अग्निकुंडात धगधगत होता. या काळात ग्रामीण भागातील जनतेची मोठी परवड होत होती. अशा कठीण काळात वसंतराव केसरकर सावंतवाडी संस्थानातील ३० ते ३५ गावांचे आधारवड बनले होते. आमचे आजी-आजोबा त्यांच्या या कारखान्यातून विडी बनविण्याचे साहित्य आणायचे व दर आठवड्याला बनविलेल्या विड्धा पुन्हा कारखान्यात नेऊन द्यायचे. अनेकजनांना या कारखान्यामुळे रोजगार मिळाला होता. विडी कारखाना हे फक्त निमित्त होते. या माध्यमातून केसरकर यांच्या घराण्याचा घराघरात घरोबा होता कोणावरही कोणताही प्रसंग उद्भवला की वसंतराव केसरकर शेट यांच्याच मदतीचा हात प्रत्येकाला मिळायचा. आपल्या वडिलांकडून जनसेवेचे हाच वसा घेतलेले केसरकर सुद्धा राजकारणात आल्यापासून २० टक्के राजकारण ८० टक्के समाजकारण करत आहेत. अतिशय शांत स्वभाव, प्रत्येकाचे म्हणणे ऐकूण घेण्याची सवय, विचाराने कोणत्याही गोष्टीवर मार्ग काढण्याचे कसब, सर्वसामान्य जनतेच्या प्रसंगांना मदत करण्याची दानत या सर्व खुबींमुळे त्यांचे व्यक्तिमत्व उठून दिसते. केसरकर घराण्याचे खुप पूर्वीपासून सावंतवाडी संस्थानातील जनतेवर उपकार आहे. हे उपकार जुनीजाणती मंडळी अजून विसरलेली नाहीत. लोण्यापेक्षा मृदु आणि प्रसंगी वज्रापेक्षाही कठीण होणाऱ्या केसरकर यांना खोटेपणा सहन होत नाही. उगाच केलेली चिखलफेक ते उधळून लावतात. अनेकवेळा त्यांनी आपल्या सडेतोड भूमिकेतून सत्याची बाजू उचलून धरली आहे. तीनवेळा आमदार व दोनदा मंत्रिपद प्राप्त झालेले हे व्यक्तिमत्व नेहमी जमिनीवरच राहिले. मोठ्या आविर्भाज्यात इतरांना कमी लेखन्याचा प्रकार त्यांच्या हातून घडला नाही. विकासकामे मंजूर करताना पक्षभेद केला नाही. सर्वांना समान न्याय देत ते सातत्याने मतदारसंघाची सेवा करत आहेत.
गेल्या पाच वर्षात त्यांनी या भागातील सुमारे २६०० कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करून घेतली आहेत. त्यातील अनेक कामे पूर्णत्वासही आली आहेत. त्यांनी केलेला विकास मतदारसंघातील प्रत्येकाला माहित आहे. त्यामुळे काहीही न करणारी मंडळी केवळ आमदारकीचे स्वप्न पाहून बिनबुडाचे आरोप करून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, जनता हुशार आहे. तुमचा नको तो धंदा लपून राहिलेला नाही. स्थानिकांच्या जमिनी कवडीमोलाने परप्रांतीयांना विकून रग्गड पैसा कमविणाऱ्यांनो तुमची आता पाळी आली आहे. पैशाने मते विकत घेता येत नाही. आपल्या जिल्ह्याची ती परंपरा नाही. त्यामुळे तुम्ही कितीही आरोळ्या ठोका, कितीही रेटून खोटे बोला, कितीही पैशाचा वापर करा, त्याचा उपयोग शुन्यच आहे. तुमचा पराभव अटळ आहे. राजन तेली यांना त्यांच्या पराभवाच्या हॅट्रिकसाठी शुभेच्छा, आमच्या मतदारसंघाचा विकास करायला आमचे नेते सक्षम आहेत. दीपक केसरकर खासदार नारायण राणे,
देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, उदय सामंत आदींसारख्या बड्या नेत्यांच्या सहकार्याने या मतदारसंघाचा कायापालट करण्यास सक्षम आहेत, असेही मांजरेकर म्हणाले.