महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

...नाहीतर केंद्रात कॅबिनेट मंत्री झालो असतो- दीपक केसरकर

06:51 PM Sep 13, 2023 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : सत्याचा नेहमी विजय होतो. आमची 2 तृतीयांशपेक्षा बहुमत होतं ही वस्तुस्थिती आहे.आम्ही त्यांना सांगायला गेलो आमदारांना परत बोलवा आम्ही परत येतो. मात्र तु्म्ही निघून जावा अस सांगण्यात आलं.प्रत्येक मोठ्या माणसाने आपला इगोला वेसन घातलं पाहिजे.नाहीतर परिस्थिती उभी राहते.भाजपने आम्हाला कधीही फोडलं नाही. युती म्हणून राहूया अस आम्ही म्हटलं होतो. मात्र त्यांनी ऐकलं नाही.बाळासाहेबांच्या विचारामुळे शिवसेनेत आलो नाहीतर त्याच वेळी मी भाजपमध्ये गेलो असतो आणि केंद्रात कॅबिनेट मंत्री झालो असतो.कोकणची जबाबदारी माझ्यावर आली असती, असा दावा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला. आज ते कोल्हापुरात बोलत होते.

Advertisement

यावेळी बोलताना ते म्हणाले की, वापरा आणि सोडून द्या हे बाळासाहेबांनी कधी केली नाही. मोदी देशातील नेत्यांना महात्मा गांधींच्या समाधी स्थळे नेऊ शकतात. मग उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीतील नेत्यांना बाळासाहेबांच्या समाधीस्थळी का नेलं नाही असा सवालही केसरकरांनी केला.

Advertisement

मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना केसरकर म्हणाले की, जरांगे-पाटील यांचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर असल्याने त्यांनी जालन्याला यावं अशी त्यांची इच्छा आहे. ज्यांच्याकडे कुणबी दाखले आहेत. त्यांना ओबीसीमधून आरक्षण देणार आहोत.जे ओपनमधून येतात त्यांना अतिरिक्त आरक्षण मिळावं यासाठी आम्ही याचिका दाखल करणार आहोत.केंद्र एका राज्याच्या संदर्भात निर्णय घेऊ शकत नाही. देशात किती ठिकाणी आंदोलन आहे पाहा. गुजरातमध्ये पटेलांचं आंदोलन, हरियाणात जाट याचे देखील आंदोलन झालं झाले आहे. ज्यांच्याकडे कुणबी दाखले आहेत त्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळेलच.आतापर्यंत ओपन कास्टला आरक्षण नव्हत मात्र पंतप्रधान मोंदींमुळे ते मिळाले.जोपर्यंत मराठा समाजाला स्वतंत्र्य आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शिक्षण, नोकरीत या आरक्षणातून लाभ देता येईल हे पाहत आहोत.

कोल्हापूरच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले,खड्डेमुक्त कोल्हापूरसाठी 100 कोटी मंजूर झालं आहे. पुढच्या काळात अंबाबाई, जोतिबा मंदिराचा विकास करायचा आहे.पर्यटनाला चालना मिळावी म्हणून राधानगरी धरणात बोटिंगला परवानगी दिली जाणार आहे.गोवामध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट होत आहे.गोव्याला आलेला पर्यटक कोल्हापूरला यावेत यासाठी प्रयत्न करणार आहोत. अंबाबाई विकास आराखड्याला गती देवून काम तातडीने पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केलं.

 

Advertisement
Tags :
#deepak kesarkar#Shivsena#udhhavthackeray
Next Article