इंधन तेलाच्या मागणीत घट
नवी दिल्ली :
राज्य आधारित तेल कंपन्यांच्या इंधन विक्रीमध्ये या महिन्यामध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. डिझेल आणि विमानाच्या इंधनाच्या विक्रीमध्ये घट दिसून आली आहे.
डिझेल व विमानाच्या इंधनाची विक्री अनुक्रमे 3.7 टक्के, 2. 8 टक्के वर्षाच्या आधारावर मार्चच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये घटलेली दिसून आली आहे. दुसरीकडे याच कालावधीत पेट्रोल विक्री मात्र 3.6 टक्के वाढली आहे. सोबत एलपीजीची विक्री 1.5 टक्के वाढली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरा दिवसातील विक्रीच्या तुलनेमध्ये पाहता सर्व इंधनाची विक्री कमी राहिली आहे. डिझेल 5 टक्के, पेट्रोल 3.3 टक्के, विमानाचे इंधन 2.7 टक्के आणि एलपीजीची विक्री 4.5 टक्के कमी राहिली आहे. मार्च 2024 च्या पहिल्या 15 दिवसाच्या तुलनेमध्ये पाहता यंदाच्या मार्चमध्ये याच अवधीत पेट्रोल विक्री 3.8 टक्के वाढीव दिसून आली आहे. एलपीजीची विक्री मात्र 1.5 टक्के घसरलेली आहे. डिझेल आणि विमानाच्या इंधनाची विक्री मात्र घसरली आहे. डिझेल विक्री 1.1 टक्का आणि विमानाच्या इंधनाची विक्री 8 टक्के इतकी मार्च 2024 मध्ये पहिल्या 15 दिवसात वाढलेली होती.