For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

22 रोजी सार्वत्रिक सुटी घोषित करा!

06:09 AM Jan 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
22 रोजी सार्वत्रिक सुटी घोषित करा
Advertisement

भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांची राज्य सरकारकडे मागणी

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

अयोध्येत श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहण्यासाठी अनुकूल व्हावे, या उद्देशाने राज्य काँग्रेस सरकारने 22 जानेवारीला सार्वत्रिक सुटी जाहीर करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी राज्य सरकारकडे केली.

Advertisement

बेंगळूरमधील राजवाडा मैदानावर आयोजित भाजप एसटी मोर्चाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. अनेक राज्यांनी 22 तारखेला सुटी जाहीर केली आहे. केंद्र सरकारनेही अर्धा दिवस सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे राज्यातही सरकारने 22 रोजी सुटी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. सुटी दिल्यास हिंदूंना अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पाहण्याची संधी मिळेल, असेही ते म्हणाले.

वाल्मिकी समुदाय-भाजपात अतूट संबंध!

वाल्मिकी समुदाय आणि भाजपमध्ये अतूट संबंध आहेत. भाजप जेव्हा-जेव्हा सत्तेवर आले तेव्हा अनुसूचित समुदायाची भूमिका मोठ्या पातळीवर होती. येडियुराप्पा यांनी केलेल्या विकासकामांमागे वाल्मिकी समुदायाच्या आमदारांचा त्याग आणि योगदान कधीही विसरता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुसूचित जमातीतील द्रौपदी मुर्मू यांची  राष्ट्रपतीपदासाठी निवड केली आहे. यावरून पंतप्रधानांची अनुसूचित जमातीविषयी असणारी आस्था लक्षात येते, असे विश्लेषणही विजयेंद्र यांनी केले.

आरक्षण वाढविण्याचे श्रेय बोम्माई, येडियुराप्पांना

भाजपने अनुसूचित जमातीसाठी अनेक योगदान दिले आहे. राज्यात या समुदायाच्या  वाढीसाठी सातत्याने संघर्ष सुरू होता. आरक्षण दर वाढवण्याचे श्रेय बसवराज बोम्माई व येडियुराप्पा यांना जाते. काँग्रेस पक्ष केवळ निवडणुकीच्या वेळी भाषणबाजी करत आला आहे. येडियुराप्पा यांच्या कार्यकाळात वाल्मिकी जयंती दिवशी सुटी जाहीर करण्यात आली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारने देशभरातील अनुसूचित जमातीच्या उत्थानाचे नेतृत्त्व करणारे भगवान बिरसा मुंडा यांची जयंती 15 नोव्हेंबर हा ‘राष्ट्रीय जनजाती दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे, असेही विजयेंद्र म्हणाले.

Advertisement
Tags :

.