विरोधकांना निर्णायक जनादेश !
06:34 AM Jun 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या आघाडीला निर्णायक जनादेश मिळणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटकपक्षही आमच्या आघाडीत येण्यासाठी रांग लावतील, असा दावा काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी केला आहे. 2019 मध्ये ज्या राज्यांमध्ये काँग्रेसचा सफाया झाला होता, त्यांच्यापैकी अनेक राज्यांमध्ये यावेळी काँग्रेसची कामगिरी उत्कृष्ट होईल. त्यामुळे विरोधकांच्या आघाडीला बहुमत मिळण्याची संधी आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. काँग्रेसला मेठे यश मिळेल असे आपल्याला का वाटते, या प्रश्नावर त्यांनी, मी हे मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यांनंतरच सांगितले होते, असे उत्तर दिले. काँग्रेसकडे लोकांचा ओढा आता पुन्हा वाढत चालला आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये तुम्हाला आश्चर्यकारक परिणाम दिसून येतील, असाही दावा त्यांनी केला.
Advertisement
Advertisement