VIDEO>>'तो' निर्णय अखेर यशस्वी ठरला! ब्रेनडेड व्यक्तीने दिले ६ जणांना जीवदान
सांगली : प्रतिनिधी
सांगली जिल्हा हा राज्यभर आरोग्य पंढरी म्हणून ओळखला जातो. देश-विदेशातील नागरिक उपचारासाठी सांगली जिल्ह्यात येतात. अनेक रुग्ण आपले उपचार करून सुखरूप समाधानी होऊन परतता सांगली जिल्हा हा आरोग्य पंढरी म्हणून ओळखला जातो.
पहा VIDEO >>> 'तो' निर्णय अखेर यशस्वी ठरला! नेमकं काय घडलं
सांगलीत वैद्यकीय क्षेत्रात मान उंचवणारा प्रयोग डॉक्टरांनी अखेर यशस्वी करून सांगली जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. रामानंद मोदानी नावाचा रुग्ण सध्या सांगलीतील उषःकाल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. उपचार दरम्यान त्याचा ब्रेनडेड झाला. यामुळे ते यातून कधीच बरे होणार नाही ही बाब डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबियांना समजावून सांगितली. ब्रेनडेड झालेल्या व्यक्तीचे अवयव जर तुम्ही दान केले तर त्यामुळे एकाच वेळी सहा ते सात जणांना जीवदान मिळू शकतो. आपल्या माणसाचे शरीर जाळून न टाकता त्याचे अंतर्गत अवयव सुस्थितीत असतील तर ते दान करावेत ही कल्पना डॉक्टरांनी मोदानी कुटुंबीयांना पटवून दिली. कारण येथे ब्रेनडेड झालेली व्यक्ती फक्त ४७ वर्षाची सशक्त व्यक्ती होती. शेवटी त्या कुटुंबीयांना ते पटलं. त्यांचे वकील असलेले भाऊ अँड.दिलीप मोदानी यांनी पुढाकार कुटुंबीयांना अवयव दानाबद्दल राजी केलं. यामुळे सहा जणांना जीवदान व डोळे मिळाले आहेत.