For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डिसायडर, ग्रो एफसी संघांची विजयी सलामी

10:00 AM Jun 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
डिसायडर  ग्रो एफसी संघांची विजयी सलामी
Advertisement

बेळगाव : फॅब स्पोर्ट्स क्लब आयोजित फॅब चषक निमंत्रितांच्या आंतरक्लब फुटबॉल स्पर्धेत डिसायडर, ग्रो स्पोर्ट्स, भारत एफसी, टेन टेन ड्यू एफसी संघांनी विजय मिळविले. सीआर सेवन टर्फ मैदानावरती आयोजित करण्यात आलेल्या फॅब चषक निमंत्रितांच्या आंतरक्लब फुटबॉल स्पर्धेत उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर आनंद चव्हाण, साईराज स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष महेश फगरे, रोहित फगरे, विजय रेडेकर, अमरदीप पाटील, ओमकार कुंडेकर, निलेश साळुंखे, साहील मेलगे, शुभम यादव, विवेक सनदी आदी मान्यवरांच्या हस्ते चेंडू लाथाडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत आठ संघांमध्ये साखळी पद्धतीचे सामने खेळविले जाणार आहेत. स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यात राहुल के. आर. शेट्टी संघाला साईराज वॉरियर्स संघाने शून्य बरोबरीत रोखले. या सामन्यात दोन्ही सत्रात गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले.

Advertisement

दुसऱ्या सामन्यात डिसायडर एफसीने टेन टेन एफसीचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात 12 व्या मिनिटाला डिसायडरच्या इक्लास निजामीच्या पासवर ओम रूपचंदाणीने पहिला गोल करून 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. 17 व्या मिनिटाला ओम रूपचंदाणीच्या पासवर इक्लास निजामीने दुसरा गोल केला. तर सामन्याच्या 32 व्या मिनिटाला ओम रूपचंदाणीच्या पासवर मुस्ताक शेखने तिसरा गोल करून 3-0 ची आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या सामन्यात ग्रो स्पोर्ट्स संघाने के. आर. शेट्टी किंग्ज संघाचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात 20 व्या मिनिटाला ग्रो एफसीच्या राहीद मुगुरखानच्या पासवर तेजस पाटीलने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 37 व्या मिनिटाला तेजस पाटीलच्या पासवर राहीद मुगुरखानने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात के. आर. शेट्टी संघाला गोल करण्यास अपयश आले. चौथ्या सामन्यात ओल्ड फॅटस संघाला भरत एफसीने शून्य बरोबरीत रोखले. या सामन्यात दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले व अनेक संधी वाया दवडल्याने सामना शून्य बरोबरीत राहिला.

Advertisement
Advertisement
Tags :

.