महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सापुचेतळे येथे वडावाप व्यावसायिकाच्या मृत्यूने खळबळ! पूर्णगड पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद

01:01 PM Sep 25, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

रत्नागिरी प्रतिनिधी

लांजा तालुक्यातील सापुचेतळे येथे बेशुद्ध अवस्थेत सापडून आलेला संदीप नारायण फटकरे (३३, रा. चांदोर, रत्नागिरी) या वडापाव व्यावसायिकाचा मंगळवारी सकाळी ११ वाजता उपारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी रात्री उशिरा हा वडापाव व्यावसायिक बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. त्याला उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते.

Advertisement

संदीप हा मागील काही वर्षापासून सापुचेतळे येथे आपल्या आई-वडिलांसह वडापावचा व्यवसाय करत होता. २३ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री उशिरा तो आपली वडापावची टपरी बंद करून आपल्या घरी जाण्यासाठी निघाला होता. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या संदीपला कुटुंबियांनी रत्नागिरीच्या सर्वसाधारण जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या संदीपचे उपचारादरम्यान निधन झाले. मंगळवारी रात्री उशिरा संदीप याचे जिल्हा शासकीय रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले. संदीप याच्या बेशुद्ध होण्याचे व त्यातून मृत्यू होण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणी पूर्णगड पोलिसांनी संदीप याच्या मृत्यूप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तसेच संदीप याचे मित्रपरिवार व नातेवाईकांची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवालानंतर संदीप याच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Advertisement

Advertisement
Tags :
Purnagad policevadapaw businessman
Next Article