For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जो बायडेन, मस्क यांना जीवे मारण्याची धमकी

06:11 AM Feb 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
जो बायडेन  मस्क यांना जीवे मारण्याची धमकी
Advertisement

 टेस्ला कर्मचारी अटकेत

Advertisement

वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि टेक अब्जाधीश एलॉन मस्क यांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्या टेस्ला कर्मचाऱ्याला टेक्सासमधून अटक करण्यात आली. 31 वषीय जस्टिन मॅककॉलीने ही धमकी दिल्याचे सखोल तपासाअंती स्पष्ट झाले होते. आरोपीच्या पत्नीने याप्रकरणी सुरक्षा यंत्रणांना फोन करून महत्त्वाची माहिती पुरविल्यानंतर संबंधितावर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून धमकी देण्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.