For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हरियाणा मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी

06:45 AM Oct 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
हरियाणा मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी
Advertisement

वृत्तसंस्था/ चंदीगड

Advertisement

हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. जिंद जिल्ह्यातील जुलाना येथील व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून ही धमकी दिल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अजमेर असे आरोपीचे नाव असून तो मूळचा जिंद जिह्यातील देवरार गावचा रहिवासी असल्याचे पोलीस अधीक्षक सुमित कुमार यांनी सांगितले. हरियाणातील मतमोजणीच्या दिवशी 8 ऑक्टोबर रोजी अजमेरमधील एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच एफआयआर नोंदवून संबंधित युवक अजमेर याला अटक करण्यात आली. व्हॉट्सअॅप ग्रुपवर मुख्यमंत्र्यांना गोळ्या घालण्याची धमकी देणारा मेसेज व्हायरल केल्याबद्दल पोलिसांनी एका व्यक्तीविऊद्ध धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला आयटी कायद्यांतर्गत अटक केली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.