महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोल्हापूर ट्रक अपघातात निगुडेतील सिताराम चव्हाण यांचा मृत्यू

11:54 AM Sep 18, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी | प्रतिनिधी

Advertisement

तालुक्यातील निगुडे येथील सिताराम उर्फ बाबल सदाशिव चव्हाण, वय ५५ या युवकाचे कोल्हापूर शिरगाव येथील ट्रक अपघातात निधन झाले.ही घटना सोमवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी सकाळी घडली .सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ते कोल्हापूर येथून गावी यायला निघाले होते. बसस्थानकाच्या दिशेने रस्त्याच्या कडेने चालत जात असताना भरधाव आलेल्या ट्रक ने त्यांना धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सिताराम यांना तेथील स्थानिकांनी तात्काळ रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.त्यांचा मृतदेह कोल्हापुरहून निगुडे गावी आणून निगुडे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले .निगुडे गावचे सरपंच लक्ष्मण निगुडकर, निवृत्त वायरमन चंद्रकांत निगुडकर, उपसरपंच तथा ग्रामस्थांनी मंगळवारी त्याच्या निवासस्थानाहून निघालेल्या अंत्ययात्रेत सहभागी होत निगुडे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.अत्यंत खडतर परिस्थितीत बालपण गेलेले सिताराम यांनी कोल्हापूर शिरगांव येथे एका कारखान्यात नोकरी स्वीकारली होती.मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वाना आपलेसे करीत असत .त्यांच्या अपघाती निधनाने सरपंच निगुडकर यांनी हळहळ व्यक्त केली आहे .सिताराम चव्हाण यांच्या पश्यात पत्नी,दोन मुलगे,सून,बहिणी, भावोजी असा परिवार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news # death # kolhapur # tarun bharat sindhudurg # news update
Next Article