For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रशियाचा हेर व्हेल ह्वाल्डिमिरचा मृत्यू

06:18 AM Sep 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
रशियाचा हेर व्हेल ह्वाल्डिमिरचा मृत्यू
Advertisement

पुतीन यांना मोठा झटका

Advertisement

वृत्तसंस्था/ मॉस्को

रशियाचा हेर व्हेल ह्वाल्डिमिर नॉर्वेच्या किनाऱ्यानजीक मृतावस्थेत आढळून आला आहे. या व्हेलने 2019मध्ये पूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले होते. 14 फूट लांब आणि 2700 पाउंड वजन असलेल्या या व्हेलला 5 वर्षांपूर्वी कॅमेऱ्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या हार्नेससोबत पाहिले गेले होते. या व्हेलच्या हार्नेसवर सेंट पीटर्सबर्गच्या उपकरणाचे चिन्ह निर्माण करण्यात आले होते. यानंतर सोशल मीडियावर याला ह्वाल्डिमिर हेर व्हेल नावाने ओळख प्राप्त झाली होती. हा व्हेल रशियन राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांना अत्यंत प्रिय होता.

Advertisement

ह्वाल्डिमिर व्हेल रशियाच्या प्राण्यांना हेरगिरी शिकविणाऱ्या प्रोजेक्टचा हिस्सा होता असे बोलले जाते. परंतु रशियाने कधीच जाहीरपणे या दाव्याला स्वीकारले नव्हते.

या व्हेलला ह्वाल्डिमिर नाव व्हेलसाठी वापरला जाणारा नॉर्वेजियन शब्द ‘ह्वाल’ आणि रशियन राष्ट्रपतींच्या नावाचा पहिला हिस्सा ‘ब्लादिमीर’चे मिश्रण आहे. बेलुगा व्हेल सर्वसाधारणपणे दुर्गम थंड आर्क्टिक महासागरात आढळून येतो. परंतु ह्वाल्डिमिर माणसांदरम्यान राहण्यात तरबेज होती. ती माणसांदरम्यान स्वत:ला सहजपणे  प्रदर्शित करायची. अशा स्थितीत तिने स्वत:च्या जीवनाचा बहुतांश काळ मानवी कैदेत घालविला असल्याचे तज्ञांचे मानणे होते.

ह्वाल्डिमिरचा मृत्यू मनाला यातना देणारा आहे. या माशाने नॉर्वेमध्ये हजारो लोकांच्या मनाला स्पर्श केला होता असे ह्वाल्डिमिरचे रक्षण करण्यासाठी काम करणारी नॉर्वेमधील एक एनजीओ मरीन माइंडचे संस्थापक सेबेस्टियन स्ट्रैंड यांनी सांगितले आहे. ह्वाल्डिमिरशी कुठल्याही प्रकारचा संपर्क टाळा असे आवाहन मागील वर्षी नॉर्वे सरकारने स्वत:च्या नागरिकांना केले होते. त्यावेळी ह्वाल्डिमिर व्हेल ओस्लोनजीक एका भागात दिसून आला होता. ‘ह्वाल्डिमिर’ म्हणून ओळखला जाणारा पांढरा व्हेल ओस्लोफजॉर्ड येथील सागरी भागात दिसून यायचा. या व्हेलमुळे छोट्या नौकांना धोका असू शकतो असे नॉर्वेच्या मासमोरी मंत्रालयाने म्हटले होते.

Advertisement
Tags :

.