For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

गँगस्टर मुख्तार अन्सारीचा मृत्यू

06:28 AM Mar 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
गँगस्टर मुख्तार अन्सारीचा मृत्यू

कारागृहात हृदयविकाराचा धक्का : उपचारादरम्यान अखेरचा श्वास  

Advertisement

वृत्तसंस्था/ गाझीपूर, लखनौ

कारागृहात कैद असलेला गँगस्टर-राजकारणी मुख्तार अन्सारी (63) याचा गुऊवारी रात्री उत्तर प्रदेशातील बांदा येथील ऊग्णालयात हृदयविकाराच्या झटक्मयाने मृत्यू झाला. कुटुंबीयांनी त्याच्या मृत्यूबाबत साशंकता व्यक्त केली असून सखोल चौकशीची मागणी केली आहे. शवविच्छेदनाअंती मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला असून आता शनिवारी त्याच्या गाझीपूर जिल्ह्यातील मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

अन्सारी याला गुरुवारी रात्री जिल्हा कारागृहातून बेशुद्धावस्थेत बांदा येथील राणी दुर्गावती वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी सुनील कौशल यांच्या म्हणण्यानुसार हृदयविकाराच्या झटक्मयाने त्याचा मृत्यू झाला. मात्र, अन्सारीचा भाऊ आणि गाझीपूरचे खासदार अफझल अन्सारी यांनी तुऊंगात त्याला ‘स्लो पॉयझनिंग’ केल्याचा आरोप केला आहे. हा आरोप अधिकाऱ्यांनी नाकारला असला तरी शवविच्छेदन अहवालाअंती मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. अन्सारीच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर राज्यभर  फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच बांदा, मऊ, गाझीपूर आणि वाराणसी जिल्ह्यात अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ऑनलाईन बेकायदेशीर पोस्टवर बारीक नजर ठेवण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांचा सोशल मीडिया सेल देखील सक्रिय करण्यात आला आहे, असे पोलीस प्रमुखांनी सांगितले.

Advertisement

अन्सारी हा मऊ सदरमधून पाचवेळा आमदार होता. तो 2005 पासून उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये तुऊंगात होता. मूळचा मऊ येथील अन्सारीचा गाझीपूर आणि वाराणसी जिह्यांमध्येही मजबूत प्रभाव असल्याचे मानले जात होते. त्याच्यावर 60 हून अधिक गुन्हे प्रलंबित आहेत. उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या न्यायालयांनी सप्टेंबर 2022 पासून त्याला आठ प्रकरणांमध्ये शिक्षा सुनावली होती. सध्या तो बांदा कारागृहात कैद होता. उत्तर प्रदेश पोलिसांनी गेल्या वषी जारी केलेल्या 66 गुंडांच्या यादीत त्याचे नाव समाविष्ट होते.

मृत्यू नैसर्गिक नसल्याचा कुटुंबीयांचा दावा

माफिया डॉन मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशात राजकीय खळबळ उडाली आहे. एकीकडे विरोधी पक्षांनी ही हत्या ठरवून न्यायालयीन चौकशीची मागणी केली असताना दुसरीकडे मुख्तार याचा लहान मुलगा उमर अन्सारी यानेही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. आपल्या वडिलांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचा दावा करतानाच एम्सच्या डॉक्टरांनी पोस्टमॉर्टम करावे अशी मागणी त्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. उमर अन्सारीने पोस्टमॉर्टमपूर्वी कागदपत्रांवर सही करण्यास नकार देत नमाज अदा करण्यासाठी निघून गेला. बांदा जिल्हा प्रशासन आणि वैद्यकीय विभागावर आपला विश्वास नसल्याचे त्याने सांगितले.

कालीबाग स्मशानभूमीत होणार दफनविधी

मुख्तार अन्सारीचे पार्थिव गाझीपूर येथील त्यांच्या वडिलोपार्जित निवासस्थानी नेण्यात येणार असून कालीबाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुख्तार अन्सारीला दफन करण्यासाठी एक कबर खोदली जात आहे, ज्याची लांबी 8 फूट आणि उंची पाच फूट आहे. कालीबाग कब्रस्तान हे मुख्तारचे वडिलोपार्जित कब्रस्तान आहे. मुख्तार अन्सारीची आई आणि वडील यांच्याशिवाय इतर पूर्वजांना येथे दफन करण्यात आले आहे.

न्यायालयीन चौकशीचे आदेश

दरम्यान, बांदा डीएम दुर्गा शक्ती नागपाल यांनी मुख्तार अन्सारीच्या मृत्यूच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. खासदार-आमदार न्यायालयाच्या न्यायाधीश गरिमा सिंह या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करतील आणि तपास अहवाल एका महिन्यात सीजेएम बांदा यांना सादर करतील. मात्र, दरम्यान, मुख्तारच्या मृत्यूवर सपा, बसपा आणि काँग्रेसकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Advertisement
Tags :
×

.