महाराष्ट्र | कोकणकोल्हापूरअहमदनगरइतरमुंबई /पुणेसांगलीसातारासोलापूर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

फ्रँक डकवर्थ यांचे निधन

06:19 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

क्रिकेट क्षेत्रामध्ये सामन्यातील पावसाच्या अडथळ्यानंतर निकालाची तरतूद करण्यासाठी नव्या नियमाचा शोध लावणारे ब्रिटनचे अव्वल संख्याशास्त्रज्ञ तसेच डकवर्थ-लेव्हिस नियमाचे जनक फ्रँक डकवर्थ यांचे वयाच्या 84 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

Advertisement

फ्रँक डकवर्थ यांचे 21 जून रोजी निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली. पावसाचा अडथळा आल्यानंतर सामन्याचा निकाल ठरविण्यासाठी डकवर्थ लेव्हिस नियमाची अंमालबजावणी 2001 मध्ये आयसीसीने अंमलात आणली. तत्पूर्वी या नियमाची पहिल्यांदा चाचणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1997 साली घेण्यात आली होती. या नियमामध्ये असलेल्या काही तृटी लक्षात घेऊन त्यामध्ये सुधारणा करण्यात आली. आणि या नव्या नियमाचे नामकरण डकवर्थ लेव्हिस स्टर्न असे करण्यात आले. ऑस्ट्रेलियाचे संख्याशास्त्रज्ञ स्टिव्हन स्टर्न यांनी काही सुधारणा सूचवून तृटी दूर केल्या.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article