ऑस्त्विज कॅम्पबाहेरील मृत्यूचा दरवाजा
जर्मनीचा क्रूर हुकुमशहा हिटलर हा ज्यूंचा कट्टर शत्रू होता. दुसऱ्या महायुद्धादरम्यान या हुकुमशहाच्या नाझी सैन्याकडून पोलडमध्ये निर्माण करण्यात आलेल्या शिबिरांमध्ये सुमारे 10 लाख लोकांनी स्वत:चा जीव गमावला होता. यात ज्यूंची संख्या सर्वाधिक होती. या यातना शिबिराचे नाव ‘ऑस्त्विज कॅम्प’ आहे.
ऑस्त्विज कॅम्पबाहेर एक मोठा लोखंडी दरवाजा असून त्याला ‘गेट ऑफ डेथ’ म्हणजेच मृत्यूचा दरवाजा म्हटले जते. मोठ्या संख्येत ज्यू लोकांना रेल्वेंमध्ये गुरांप्रमाणे भरून याच दरवाजाने यातना शिबिरांमध्ये नेण्यात येत होते आणि त्यानंतर त्यांना कल्पनाही करता येणार नाही अशा यातना दिल्या जात होत्या. ऑस्त्विज कॅम्पची निर्मिती तेथुन कुणालाही पलायन करता येणार नाही अशाप्रकारे करण्यात आली होती. कॅम्पमध्ये ज्यू, राजकीय विरोधक आणि समलैंगिकांकडुन बळजबरीने कामे करविली जात होती. याचबरोबर वृद्ध आणि आजारी लोकांना कॅम्पमधील गॅस चेम्बरमध्ये टाकून जिवंत जाळले जात होते. लाखो लोकांना या गॅस चेम्बरमध्ये टाकून मारून टाकण्यात आले होते.
ऑस्त्विज कॅम्पच्या परिसरात एक भिंत असून त्याला वॉल ऑफ डेथ म्हटले जाते. येथे अनेकदा लोकांना बर्फादरम्यान उभे करून गोळ्या घातल्या जात होत्या. नाझींनी अशाप्रकारे हजारो लोकांना ठार केले हेते. 1947 मये नाझींच्या या यातना शिबिराला पोलंडच्या संसदेने एक कायदा संमत करत शासकीय संग्रहालयात रुपांतरित केले होते. म्युझियममध्ये सुमारे 2 टन केस असल्याचे समजते.. मृत्यूपूर्वी नाझी सैनिक ज्यू आणि अन्य लोकांचे केस कापून घेत होते. याचबरोबर कैद्यांची लाखो पादत्राणं आणि अन्य सामग्रीही संग्रहालयात आहे.