Sangli news : वंजारवाडी ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध आमरण उपोषण सुरू
हातनूर बंजारवाडी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार
हातनूर : तासगाव तालुक्यातील बंजारवाडी ग्रामपंचायतीच्या गैर कारभाराबाबत ग्रामस्थ बजरंग बाळासो चवदार व योगेश पोपट दौंड यांनी प्रथम ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी, तहसीलदार, तासगाव पोलीस स्टेशन, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, यांना लेखी निवेदन देत आजपासून ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर आमरण उपोषणास सुरुवात केली.
उपोषणधारकाने गावातील विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व काही कामे निकृष्ट पद्धतीची झाली असल्याचा आरोप करत सदर कामांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे त्यातील काही कामे पुढील प्रमाणे आहेत ओंबासे बस्तीमधील अपूर्ण गटार असताना बिल काढली.
अंगणवाडी शौचालय बिल पेड असताना काम अपूर्ण आहे. विरंगळा केंद्राचे बिल पेड आहे काम केलेले नाही. सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन बिल पेड आहे काम नाही. शक्तिमान चौक येथे गणपती शेड आहे लोकवर्गणीतून केलेल्या कामाचे बिल ८९४६३ काढण्यात आले आहे. मासिक ठरावांमध्ये ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्यांचे नमुने वेगवेगळे दिसतात आणि मासिक मीटिंग समाप्ती नंतर कोरी पाने सोडलेली आहेत.
जवळपास ७० ते ८० टक्के ग्रामपंचायत गैरकारबाराबाबत बेमुदत कामे सरपंच यांच्या नातेवाईक आणि सदस्य यांनी मिळून केलेले आहेत. याची संपूर्ण चौकशी पंचायत समिती मार्फत व्हावी. तसे आदेश निधे पर्यंत उपोषण मागे घेणार नाही, काही अनुचित प्रकार घडला तर प्रशासन जबाबदार राहील असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या उपोषणास गावातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी तरुण भारत संवादशी बोलताना सांगितले.