कोबींग ऑपरेशनमध्ये 18 प्राणघातक शस्त्र जप्त; दोन संशयीत जेरबंद, एक पसार
राजारामपुरी पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास राबविलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये जप्त केलेली शस्त्र
कोल्हापूर प्रतिनिधी
जवाहरनगर परिसरात राबविलेल्या कोबींग ऑपरेशनमध्ये राजारामपुरी पोलिसांनी 18 प्राणघातक शस्त्रs जप्त करत दोघा सराईत गुंडांना जेरबंद केले. राहूल संतोष घोलप (वय 19, रा. दत्तमंदीर लगत राजेंद्रनगर), सोहेल महमंद हुसेन मलबारी (वय 30, रा. सिरत मोहल्ला मशीदजवळ, सुभाषनगर) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. तर गुरुदत्त शांतीनाथ पोळ (रा. बिजली चौक, जवाहरनगर) हा पसार झाला असून, या तिघांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी फरारी, रेकॉर्डवरील गुन्हेगार, यांचा माग काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. राजारामपुरी हद्दीतील राजेंद्रनगर, जवाहरनगर, सुभाषनगर, विक्रमनगर या संवेदनशील परिसरात गुन्हे शोध मोहीम राबविण्याची सुचना दिली. राजेंद्रनगर येथे संशयित संतोष घोलप यांच्या कब्जात असलेली 3 हजार 500 रूपये किंमतीची 12 हत्यारे, त्यात एडका, तलवारी, चाकू, कोयता अशी धारदार शस्त्रs जप्त करून त्यालाही ताब्यात घेतले. त्यानंतर सुभाषनगरात राबविण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सोहेल मलाबारी यांच्या ताब्यातील दुचाकी व एक मोठा कोयता असे एकूण 70 हजार 300 रूपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यालाही अटक केली. त्यानंतर जवाहरनगरात रबाविलेल्या शोध मोहीमेत गुरुदत्त पोळ यांचे स्क्रॅप दुकानात एडका, तलवार, चाकू, कोयता अशी एकूण 6 धारदार शस्त्रs आढळली, ती जप्त करण्यात आली . मात्र, संशयित गुरुदत्त हा तेथे सापडला नाही.
या मोहीमेत अपर पोलिस अधीक्षक जयश्री जाधव, पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे, सतीशकुमार गुरव, अजय सिंदकर, अविनाश कवठेकर आदी अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते