महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हिजबुल्लावर घातक ‘पेजर’ हल्ला

06:59 AM Sep 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

18 ठार, हजारो जखमी, इस्रायलच्या मोस्साद गुप्तचर संस्थेवर कारस्थानाचा आरोप

Advertisement

वृत्तसंस्था / लेबेनॉन

Advertisement

हिजबुल्ला या इराणसमर्थित इस्लामी दहशतवादी संघटनेवर घातक अशा स्वरुपाचा ‘पेजर’ हल्ला झाला आहे. या हल्ल्यात या संघटनेच्या काही महत्वाच्या म्होरक्यांसह आतापर्यंत कमीत कमी 18 जण ठार झाले आहेत. तर कमीत कमी 4 हजार जण जखमी झाले आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे मृतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. हा हल्ला इस्रायलची गुप्तचर संस्था ‘मोस्साद’ने घडविल्याचा आरोप केला जात आहे.

मंगळवारी हा हल्ला करण्यात आला. हिजबुल्ला ही दहशतवादी संघटना संदेशवहनासाठी जुन्या काळातील ‘पेजर’ या तंत्रज्ञानाचा उपयोग करते. हिजबुल्लाच्या हजारो हस्तकांकडे आणि दहशतवाद्यांकडे हे पेजर उपकरण संदेशवाहनासाठी असते. या पेजर्सचे अचानक स्फोट मंगळवारी होऊ लागले. एका तासाच्या अंतरात असे कमीतकमी 10 हजार पेजर्स फुटले. त्यामुळे त्यांचा उपयोग करणारे हिजबुल्लाचे हजारो हस्तक जखमी झाले. तर काहीजण ठार झाले.

हिजबुल्लाला मोठा धक्का

या हल्ल्यामुळे हिजबुल्लाला मोठा धक्का बसल्याचे दिसून येत आहे. या संघटनेचे अनेक हस्तक आणि दहशतवादी जखमी झाल्याने जायबंदी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी लेबेनॉन आणि सिरीयातील रुग्णालयेही अपुरी पडू लागली आहेत. कोणतीही कल्पना नसताना हा हल्ला झाल्याने या संघटनेचे हजारो दहशतवादी आणि त्यांचे नेते बेसावध होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हिजबुल्लाच्या एका खासदाराचा पुत्रही या हल्ल्यात ठार झाला या संघटनेची दूरसंपर्क यंत्रणा उध्वस्त झाली आहे.

कसा झाला हल्ला ?

सर्वसामान्य माणसे उपयोगात आणतात त्या मोबाईलचा मागोवा घेता येतो तसा पेजरचा घेता येत नाही. त्यामुळे हिजबुल्लाचे दहशतवादी पेजर्स या 1980 आणि 1990 च्या दशकातील संपर्क यंत्रणेचा उपयोग करतात. सहा महिन्यांपूर्वी अशी किमान 10 हजार पेजर उपकरणे हिजबुल्लाने एका तैवानी कंपनीकडून विकत घेतली होती, अशी माहिती देण्यात आली आहे. या पेजर उपकरणांमध्ये 3 ते 5 ग्रॅम वजनाची अत्याधुनिक स्फोटके आधीच बसविण्यात आली होती. विशिष्ट वेळी या पेजरवर एक संदेश पाठविण्यात आला. पेजरच्या धारकाने तो संदेश वाचण्यासाठी उघडताच स्फोट झाला. एका तासाच्या काळात असे 10 हजार स्फोट घडविण्यात आले. परिणामी, लेबेनॉन पासून सिरीयापर्यंत हाहाकार उडाला.

हल्ला कोणी केला ?

हा हल्ला इस्रायलच्या ‘मोस्साद’ या गुप्तचर संघटनेने केला असावा असा संशय आहे. हिजबुल्लाचे पालकत्व स्वीकारलेल्या इराणने तसा आरोप केला आहे. तर हिजबुल्लाने या हल्ल्याचा सूड इस्रायलवर घेतला जाईल अशी धमकी दिली आहे. तथापि, मोस्सादने मात्र अद्याप या हल्ल्याचे उत्तरदायित्व स्वीकारलेले नाही. मात्र, 1966 पासून या गुप्तचर संस्थेने इस्रायलच्या शत्रू नेत्यांचा नाश करण्यासाठी अशा फोनबाँबचा उपयोग केल्याचा इतिहास असल्याने हा हल्लाही याच संस्थेने घडविला असावा, अशी शक्यता अमेरिकेतील वृत्तपत्रांकडूनही व्यक्त करण्यात येत आहे.

पेजर काय आहे?

पेजर हे मोबाईलसारखेच उपकरण आहे. त्यावर मोबाईलप्रमाणेच ध्वनीसंदेश किंवा शब्दसंदेश येतात किंवा पाठविता येतात. मात्र, सध्याच्या काळातील मोबाईलच्या तुलनेत या उपकरणाची क्षमता कमी असते. या उपकरणातून पाठविण्यात आलेल्या संदेशांचा मागोवा घेता येत नाही. याचा अर्थ असा की हे संदेश पकडता किंवा ट्रॅक करता येत नाहीत. त्यामुळे पेजरधारक कोणत्या स्थानी आहे, याचा शोध घेता येत नाही. त्यामुळे दहशतवाद्यांकडून या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येतो. हे तंत्रज्ञान 1980 ते 2000 या काळात जगभरात प्रचलित होते. त्या काळात अनेकांच्या खिशात हे पेजर्स असत. हे जुन्या काळातील तंत्रज्ञान उपयोगात आणणे दहशतवाद्यांसाठी सोयीचे असल्याने त्याचा आजही उपयोग होतो.

गाझा शांतता चर्चेवर परिणाम?

या हल्ल्यामुळे गाझापट्टी संदर्भात इस्रायल आणि हमास यांच्यात चाललेल्या शांतता चर्चेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता अमेरिकेने व्यक्त केली आहे. हा हल्ला कोणी घडविला यासंबंधी आत्ताच काहीही विधान करता येणे अशक्य आहे. तथापि, अमेरिकेचा यात हात नाही, असे व्हाईट हाऊस प्रवक्त्याने स्पष्ट केले.

सर्वात मोठा हल्ला

इस्रायल, हिजबुल्ला आणि हमास यांच्यात साधारण वर्षभर चाललेल्या सशस्त्र संघर्षाच्या काळात करण्यात आलेला हा सर्वात मोठा आणि अचूक हल्ला आहे. या हल्ल्यात हिजबुल्लाची प्रचंड हानी झाली असून ती घोषित हानीपेक्षा कितीतरी पटींनी अधिक आहे, असे तज्ञांचे मत आहे. असा हल्ला घडविण्याची तांत्रिक क्षमता इस्रायलपाशीच आहे, असेही अनेक जागतिक अभ्यासकांचे मत आहे.

मोस्सादच्या तंत्रवैज्ञानिक क्षमतेचा प्रत्यय?

ड असा अचूक आणि अत्याधुनिक तंत्रवैज्ञानिक हल्ला इस्रायललाच शक्य

ड या हल्लामुळे हिजबुल्लाचे नेटवर्क उध्वस्त झाले असण्याची दाट शक्यता

ड हल्ला कोणी केला हे समजले नसले तरी मोस्सादवर आरोपांचा वर्षाव

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article