मृत मुलांचे क्रीडामैदान
तुम्ही अनेकदा भुताटकीयुक्त बंगला किंवा महालाविषयी ऐकले असेल? परंतु तुम्ही भुताटकीयुक्त पार्कविषयी ऐकले आहे का? जगात एक असे पार्क आहे, तेथे बहुधा मुलांपेक्षा अधिक भूतं येत असावीत. या पार्कला स्वत:चा भयावह इतिहास आणि भयानक घटनांमुळे ‘मृत मुलांचे क्रीडामैदान’ म्हणून ओळखले जाते.
हे पार्क अमेरिकेच्या अलबामाच्या हंट्सविले येथे आहे. स्वत:चे आधुनिक झोपाळे आणि चढाईच्या उपकरणासोबत हे छोट्या मुलांसाठी एक मनोरंजनाचे क्षेत्र असेल असे वाटते. परंतु हे पार्क अन्य पार्कसारखे नाही, येथून जाणारे लोक अनेकदा झोपाळे आपोआप हलत असल्याचे पाहत असतात. तसेच येथे भुतांसारख्या आकृत्या दिसत असल्याचा दावा अनेक लोकांकडून केला जात असतो.
हे पार्क मेपल हिल दफनभूमीला लागून निर्माण करण्यात आल्याने असे घडत असल्याचे बोलले जाते. स्पॅनिश फ्लू महामारीच्या पीडितांना येथे दफन करण्यात आले होते. क्रीडामैदान तीन दिशेशने चुनादगडांनी वेढलेले आहे, यामुळे या क्षेत्रात अनेक गुहा निर्माण झाल्या आहेत. यामुळे हे एक छायादार रुप घेते जे त्याच्या भीतीदायक वदंतांना अधिक बळ देते. ऐतिहासिक दफनभूमी नजीक असणेही याच्या कहाण्यांसाठी कारणीभूत आहे.
स्थानिक किशोरवयीनांनी हे भयावह नाव दिले आहे. जे पिढ्यांपासून चालत आले आहे. तरीही हे अनेक परिवारांसाठी वापरण्यात येणारे ठिकाण ठरले आहे. 1918 च्या स्पॅनिश फ्लू महामारीमुळे हंट्सविलेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या मुलांना एका मोठ्या संख्येत क्रीडामैदानाच्या जवळ मेपल हिल भूखंडात दफन करण्यात आल्याची वदंता आहे.
अंधार पडल्यावर मुलांचे आत्मे धावण्यासाठी आणि खेळण्यासाठी बाहेर पडतात असे काही लोकांचे मानणे आहे. या अलौकिक मनोरंजनासाठी रात्री 10 ते पहाटे 3 वाजण्यादरम्यानचा कालावधी असल्याचे मानण्यात येते. या पार्कमधील अनेक झोपाळे आपोआप हलत असतात असा दावा अनेक जण करतात. भूतांसारखा प्रकाश चहुबाजूला दिसून येत असल्याचाही दावा काही जणांकडून केला जातो.