कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केसांमधील उवा काढण्याचे काम

06:01 AM Nov 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लोक समजतात मूर्ख, परंतु होते मोठी कमाई

Advertisement

लहान मुलांच्या केसांमध्ये उवा निर्माण होण्याचा धोका अधिक असतो, कारण ते स्वत:ला प्रौढांप्रमाणे साफ ठेवू शकत नाही. अशास्थितीत अनेकदा आईच मुलांच्या केसांमधील उवा काढून टाकत असतात. परंतु ऑस्ट्रेलियातील एक महिला हे काम अनोळखी लोकांसाठी करते. हा तिचा पेशा असून याकरता ती मोठी रक्कम आकारते.

Advertisement

सिडनी येथे राहणारी 25 वर्षीय रॅचेल मरोन दररोज शेकडो उवा आणि निट्सना कुठल्याही सुरक्षात्मक उपकरणाशिवाय हटवते. तिच्या कामावरून तिला अनेकदा मूर्ख ठरविले जाते. परंतु हेच माझे खरे काम असल्याचे ती मानते. रॅचेल जवळपास 10 वर्षांपासून लोकांना उवांच्या समस्यांपासून मुक्ती मिळवून देत आहे. कधीकधी तिला देखील उवा होत असतात, तरीही माझे काम माझ्यासठी अत्यंत रिलॅक्सिंग असल्याचे ती सांगते. मी हे काम करेन असा विचारही कधी केला नव्हता. परंतु आता हे काम माझ्यासाठीच असल्याचे वाटते. लोकांना हे काम किळसवाणे वाटत असले तरीही हा पेशा माझ्यासाठी महत्त्वाचा असल्याचे रॅचेल सांगते. रॅचेल स्वत:च्या कामाची झलक टिकटॉकवर 4.2 दशलक्ष फॉलोअर्ससोबत शेअर करते. तिचे व्हिडिओ अनेकदा व्हायरल होत असतात.

रॅचेल प्रत्येक ट्रीटमेंटसाठी 150 ऑस्ट्रेलियन डॉलर्सचे शुल्क आकारते आणि ती कुठल्याही इन्फेस्टेशनला पूर्णपणे समाप्त करत असल्याचा दावा करते. परंतु गंभीर प्रकरणांमध्ये ग्राहकांना पुन्हा अपॉइंटमेंट घ्यावी लागते. तिला एका ग्राहकासाठी सर्वाधिक 17 तास हे काम करावे लागले होते. कामादरम्यान ती ग्लोव्हज घालत नाही तसेच हेयरनेट वापरत नसल्याने अनेक लोक तिला मूर्खात काढतात. रॅचेलने सुरुवात एका फार्मसीतून केली होती, जेथे एक छोटेस लाइस क्लीनिक होते. तेथे काम करताना तिला या पेशाबद्दल आपलेपणा वाटू लागला आणि तिने यालाच करियर म्हणून निवडले. मी प्राणी किंवा मुलांसोबत काम करण्यासाठी नेहमीच उत्सुक असायचे. बहुधा कुठल्या न कुठल्या रुपात हे स्वप्न पूर्ण झाल्याचे ती सांगते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article