महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

डेव्हिड वॉर्नरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप

06:02 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ किंग्जटाऊन

Advertisement

आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर-8 फेरीतील मंगळवारी सकाळी येथे खेळविण्यात आलेल्या महत्त्वाच्या शेवटच्या सामन्यात अफगाणने बांगलादेशचा पराभव करत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केल्याने विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आले. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा सलामीचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय झाली केला.

Advertisement

2021 साली झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने अजिंक्यपद पटकाविले होते. त्यानंतर 2024 च्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर-8 फेरीतील गट एक मध्ये ऑस्ट्रेलियाला केवळ 2 गुणासह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या फेरीमध्ये ऑस्ट्रेलियाने बांगलादेशवर एकमेव विजय मिळविला होता. त्यानंतर त्यांना सोमवारच्या सामन्यात भारताकडून पराभवाचा धक्का मिळाला होता. अफगाणने मंगळवारच्या सामन्यात बांगलादेशचा पराभव करुन या स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आणले.

37 वर्षीय डेव्हिड वॉर्नरने आपल्या 15 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीला निरोप देण्याचे निश्चित केले. 2009 च्या जानेवारी महिन्यात वॉर्नरने टी-20 प्रकारातील सामन्यात आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. 2024 च्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सोमवारी येथे खेळविण्यात आलेल्या सुपर-8 फेरीतील सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी पराभव केला. या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने केवळ 6 धावा जमविल्या. अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात वॉर्नर सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद झाला. निराश झालेल्या वॉर्नरने मैदानातून खाली मान घालत पॅव्हेलियनकडे प्रस्थान केले. यावेळी उपस्थित असलेल्या क्रिकेट शौकिनांनी उभे राहून वॉर्नरला मानवंदना दिली नाही. टी-20 प्रकारातील वॉर्नरचा हा शेवटचा सामना ठरला. त्याचप्रमाणे वनडे क्रिकेटमध्ये 2023 च्या नोव्हेंबर महिन्यात अहमदाबाद येथे झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान भारताचा पराभव करुन अजिंक्यपद मिळविल्यानंतर वॉर्नरने वनडे क्रिकेटमधील निवृत्तीचा निर्णय घेतला होता. तसेच गेल्या जानेवारीत वॉर्नरने पाकविरुद्धच्या कसोटी सामन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. 2024 ची आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा ही वॉर्नरची शेवटची ठरली.

क्रिकेटच्या टी-20 प्रकारामध्ये ऑस्ट्रेलियातर्फे डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक धावा नोंदविण्याचा विक्रम केला आहे. त्याने 110 सामन्यात 33.43 धावांच्या सरासरीने 3277 धावा जमविल्या आहेत. त्यामध्ये एक शतक आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 प्रकारामध्ये सर्वाधिक धावा जमविणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वॉर्नर सातवा फलंदाज आहे. वॉर्नरने 112 कसोटीत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व करताना 44.59 धावांच्या सरासरीने 8,786 धावा जमविल्या असून त्यामध्ये 26 शतके आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे. 2011 ते 2024 या कालावधीत त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले. वनडे क्रिकेटमध्ये वॉर्नरने 161 सामन्यात 45.30 धावांच्या सरासरीने 6,932 धावा जमविल्या असून त्यामध्ये 22 शतके आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे. क्रिकेटच्या विविध प्रकारामध्ये वॉर्नरने 49 शतकांसह 19000 धावा जमविल्या आहेत. आयपीएल स्पर्धेत वॉर्नरने 2014 ते 2021 या कालावधीत सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधीत्व करताना 2016 साली त्याने हैदराबाद संघाला आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article