इंग्लंडचा डेव्हिड मलान निवृत्त
06:00 AM Aug 29, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
लंडन : इंग्लंडचा टी-20 मधील अव्वल फलंदाज डेव्हिड मलानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. येथील एका दैनिकाशी बोलताना तो म्हणाला की, ‘व्हाईटबॉल क्रिकेटमध्ये मी अपेक्षेहून जास्त सरस कामगिरी केली. मात्र कसोटी क्रिकेटची तीव्रता आपण हाताळण्यात अपयशी ठरलो.’ त्याने इंग्लंडतर्फे 22 कसोटी, 30 वनडे, 62 टी-20 सामन्यांत प्रतिनिधित्व केले. त्याने टी-20 मध्ये लक्षणीय यश मिळविले. 2020 मध्ये त्याने फलंदाजीच्या क्रमवारीत पहिले स्थान पटकावले होते. इंग्लंडने 2022 मध्ये टी-20 वर्ल्ड जिंकला होता, त्या संघाचा तो सदस्य होता. गेल्या वर्षी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो इंग्लंड संघातून खेळलेला नाही आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या व्हाईटबॉल मालिकेसाठीही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article