अभिनेत्री आरती छाब्रियाला पुत्ररत्न
सलमान खान, अक्षय कुमार आणि गोविंदा यांच्यासोबत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलेल्या आरती छाब्रियाने चाहत्यांसोबत एक गुडन्यूज शेअर केली आहे. आरती दीर्घकाळापासून मोठ्या पडद्यावरून गायब आहे. परंतु आरती सोशल मीडियाद्वारे स्वत:च्या चाहत्यांच्या संपर्कात असते.
आरतीने 2018 मध्ये विशारद बिडासीसोबत विवाह करत संसार थाटला होता. आरती सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असली तरीही चर्चेत आली आहे. आरतीने एक महिन्यापूर्वी म्हणजेच 4 मार्च रोजी पुत्राला जन्म दिला आहे. तसेच तिने स्वत:च्या मुलाला युवान हे नाव दिले आहे.
आरतीने वयाच्या 41 व्या वर्षी पुत्राला जन्म दिला आहे. आरती विवाहानंतर ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली होती. आरतीने ‘लज्जा’, ‘आवारा पागल दीवाना’, ‘तुमसे अच्छा कौन है’, ‘हे बेबी’ यासारख्या काही चित्रपटांमध्ये काम पेले आहे. आरतीने बॉलिवूडपासून अंतर राखले असले तरीही अभिनयाच्या क्षेत्राला अद्याप रामराम ठोकलेला नाही. काही काळानंतर बॉलिवूडमध्ये परतण्याची इच्छा ती बाळगून आहे.