महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘वंडर वुमन’ फेम गॅल गॅडोटला कन्यारत्न

06:31 AM Mar 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चौथ्यांदा आई झाली अभिनेत्री

Advertisement

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री गॅल गॅडोट चौथ्यांदा आई झाली आहे. तिने मुलीला जन्म दिला आहे.  अभिनेत्रीने सोशल मीडियावर स्वत:च्या नवजात मुलीचे छायाचित्र शेअर करत चाहत्यांना चकित केले आहे. कारण गॅलने स्वत:च्या गरोदरपणाविषयी अत्यंत गुप्तता राखली होती.

Advertisement

गॅलने इन्स्टाग्रामवर चाहत्यांना मुलीच्या जन्माची खूशखबर दिली आहे. या छायाचित्रात गॅल ही रुग्णालयात नवजात मुलीसोबत दिसून येते. माझी गोड मुलगी, प्रसूती सोपी नव्हती, परंतु आम्ही करून दाखविले असे 38 वर्षीय गॅलने मुलीचे छायाचित्र शेअर करत म्हटले आहे.

अभिनेत्रीने स्वत:च्या मुलीच्या नावाचाही खुलासा केला आहे. तिने मुलीचे नाव ओरी ठेवले आहे, याचा हिब्रू भाषेतील अर्थ ‘माझा प्रकाश’ असा होतो. स्वत:च्या नावाच्या अर्थाला सार्थक करत तिने आमच्या जीवनात मोठा प्रकाश आणला आहे.  मुलींच्या घरात तिचे स्वागत असल्याचे गॅलने नमूद केले आहे.

गॅलने जारोन वर्सानोसोबत 2008 मध्ये विवाह केला होता. या दांपत्याने 2011 मध्ये पहिल्या मुलीला जन्म दिला होता, तिचे नाव अल्मा ठेवण्यात आले होते. तर 2017 मध्ये दुसरी मुलगी माया तर 2021 मध्ये तिसरी मुलगी डेनिएलाचा जन्म झाला होता.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article