कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Sangli : दत्ताजीराव पाटील पतसंस्थेने विश्वासार्हता जपली : आमदार जयंत पाटील

01:27 PM Oct 26, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                      दत्ताजीराव पाटील पतसंस्थेच्या २५ वर्षांचा रौप्यमहोत्सव

Advertisement

इस्लामपूर : ग्रामीण भागात अर्थव्यवस्थेची घडी बसवण्याचे काम पतसंस्था करतात. पेठ येथील दत्ताजीराव पाटील पतसंस्थेने या परिसरात आर्थिक क्षमता सिद्ध केली आहे. या संस्थेने ग्राहकांची विश्वासर्हता संपादन केली आहे. संस्थेने नियमपालन, पारदर्शकता आणि विश्वासाने नेत्रदीपक प्रगती साधली आहे, असे प्रतिपादन आ. जयंत पाटील यांनी केले.ते पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात बोलत होते.

Advertisement

यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, प्रा. शामराव पाटील, शामराव पाटील, सयाजी पाटील, सुनील तवटे, अतुल पाटील, अभिराज पाटील, नेर्लेचे सरपंच संजय पाटील, बाळासाहेब पाटील, सुश्मिता जाधव, सुनीता देशमाने, डॉ. सुभाष भांबुरे, हेमंत पाटील, भारती पेठकर, हंबीरराव पाटील, हर्षवर्धन पाटील, पै. जयंत पाटील, नामदेव मोहिते, संग्रामसिंह जाधव, जयवंत पाटील, के. डी. पाटील सयाजी पाटील काका, सुनील तवटे, अतुल पाटील, अभिराज पाटील, नर्लेचे सरपंच संजय पाटील, बाळासाहेब पाटील, सुश्मिता जाधव, सुनीता देशमाने, डॉ. सुभाष भांबुरे, हेमंत पाटील, भारती पेठकर, हंबीरराव पाटील, हर्षवर्धन पाटील, पै.जयंत पाटील, नामदेव मोहिते, संग्रामसिंह जाधव, जयवंत पाटील, के.डी. पाटील उपस्थित होते.

आ.पाटील म्हणाले, "विजय पाटील यांनी २५ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या संस्थेने नेत्रदीपक प्रगती साधली. दत्ताजीराव पाटील यांचा वारसा पुढे नेत त्यांनी संस्था निखळपणे आणि नियमांचे काटेकोर पालन करून चालवली आहे. संस्थेचे एनपीए शून्य आहे 'ज 'वर्जा ठी संरचेची प्रगतीत सातत्य असल्याचे दर्शविते. फक्त गरजू आणि परतफेड करू शकणाऱ्यांनाच कर्ज दिल्याने संस्वेची विश्वासार्हता टिकून आहे. चुकीच्या लोकांना कर्ज न देता नैसर्गिक वाढीवर भर देणाऱ्या या संरखेची वाटचाल आदर्शवत आहे."

ते म्हणाले, "संस्थेने जुन्या सदस्यांशी नाळ जोडून ठेवती आहे. सध्याच्या काळात सरकारी अधिकायांना काम करणे सोपे नाही, परंतु वता बापू पतसंस्थेने प्रामाणिकपणे काम करत चांगली उंची गाठली आहे. दत्ताजीराव बापूंचा नावलौकिक मोठा होता, स्व. राजारामबापू पाटील यांच्याशी त्यांचे घट्ट संबंध होते. त्याच परंपरेचा वारसा ही विजय पाटील संस्थेच्या माध्यमातून पुढे नेत आहेत." नाईक म्हणाले "आर्थिक संस्था चालवणे हे जिकिरीचे काम आहे. संस्थेच्या भविष्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे गरजेचे आहे. जिल्हा बँकेचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असून सव्वादोनशे कोटी रुपयांचा नफा झाला आहे. त्याच पद्धतीने विजय पाटील राजकारण न करता सामाजिक कार्यावर भर देत आहेत. संस्था सर्व गरजूंपर्यंत आर्थिक ताकद पोहोचवत आहे."

विजय पाटील म्हणाले "गरजूंना उन्नतीसाठी मदत करत आलो आढीत, संस्थेला 'अ' वर्ग प्राप्त होत आहे. साहेबांच्या आशीर्वादाने संस्था नावारूपास आली आहे. तळागाळातील लहान-मोठ्या उद्योजकांना कर्जपुरवठा करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम आम्ही करत आहोत. ही परंपरा ठेवू.

Advertisement
Tags :
@sanglinews#DattajiraoPatilPatSanshta#FinancialInstitution#islampur#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaTrustAndTransparency
Next Article