महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शहरात विविध ठिकाणी दत्त जयंती साजरी

11:12 AM Dec 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : स्वामी समर्थ देवस्थानतर्फे दत्त जयंती कपिलेश्वर तलाव शेजारील श्री स्वामी समर्थ देवस्थान बेळगावतर्फे शनिवारी दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. सायंकाळी सामूहिक आरती झाली. पहाटे विविध धार्मिक कार्यक्रम झाले. सोमवारी 16 रोजी दत्त जन्मोत्सव होऊन पूजन आणि त्रिकाल आरतीने सांगता होणार आहे.

Advertisement

शांती कॉलनी, टिळकवाडी

Advertisement

शांती कॉलनी टिळकवाडी येथे दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. सकाळी पूजा झाल्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी भवानीनगर, पापामळा भक्तांनी याचा लाभ घेतला. दोन हजारहून अधिक भाविक उपस्थित होते.

नरगुंदकर भावे चौक

नरगुंदकर भावे चौक येथील औदुंबर सावली दत्त मंदिरात दत्त जयंती उत्साहात पार पडली. यावेळी वारकरी संप्रदायाचे भजन व कीर्तन झाले. सायंकाळी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. भक्तांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला. अनंत बाडीवाले, गजानन शिंदे, सुधाकर कडोलकर, बाळू गावडे, पुजारी आणि सहकारी भक्तजन यांच्या सहकार्यातून मागील 15 वर्षांपासून दत्त जयंती साजरी होत आहे. याप्रसंगी बाळासाहेब काकतकर, शेखर हंडे, रमेश पावले, राजेंद्र हंडे, भरत पुरोहित, कन्नुभाई ठक्कर, हिडदुग्गी उपस्थित होते.

अनगोळ गुरुदत्त सेवा संघ

अनगोळ येथील गुरुदत्त सेवा संघातर्फे दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने महापूजा आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. शनिवारी सायंकाळी जन्मोत्सव पार पडला. यावेळी महिलांनी पाळणा गीते सादर केली. रविवारी सकाळी सपत्निक राजू पवार यांनी पूजन केले. यावेळी म. ए. समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, माजी नगरसेवक मोहन भांदुर्गे, विनायक गुंजटकर, प्रकाश रायबागी, राकेश पलंगे, उमेश कुऱ्याळकर उपस्थित होते. त्यांचा शाल व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते, महिला, पंच कमिटी, सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

विजयनगर येथे श्रीदत्त जयंती

विजयनगर येथील सडेकर बंधूंच्या घरासमोरील दत्त मंदिरात दत्त जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध कार्यक्रम झाले. शनिवारी सायंकाळी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article