महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राज्यात नामर्दांचं सरकार ! राज्यावर संकट असताना आपले सुलतान आणि डेप्य़ुटी सुलतान...

01:19 PM Nov 30, 2023 IST | Abhijeet Khandekar
MP Sanjay Raut
Advertisement

शिवसेना नेते दत्ता दळवींना मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेत्याच्या अटकेनंतर राजकिय वातावरण चांगलेच तापले असून शिंदे गट व ठाकरे गट यांच्याकडून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप केले जात आहेत. दत्ता दळवींच्या अटकेनंतर आक्रमक झालेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टिका करत राज्यात नामर्दांचं सरकार असल्याचा आरोप केला.

Advertisement

मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर दत्ता दळवींच्या विधानाचा समाचार शिंदे गटाच्या नेत्यांकडून घेताना त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. काही अज्ञातांनी बुधवारी संध्याकाळी दत्ता दळवींची गाडी फोडली. या घटनेनंतर खासदार संजय राऊत यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार टीका करताना, “ दत्ता दळवी सध्या तुरुंगात आहेत...त्यांच्या घरी कुणी नाहीये...दोन- चार षंढ आले आणि गाडीच्या काचा फोडून निघून गेले...ही त्यांची मर्दानगी. ते भाडोत्री गुंड अशा गोष्टी करण्यासाठी घेतात आणि गुंडगिरी चालवतात.” असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

Advertisement

खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना पुढे म्हणाले, “ज्यानी गाडी फोडली, तो खरा मर्द असता तर त्यानं तिथे थांबायला पाहिजे होतं. पळून काय जाताय? तुम्ही तुमच्या नेत्याच्या सांगण्यावरून आला आहात ना? मग तुमचा नेता नामर्द आहे का? पळून का जाताय? थांबा की...आमचे शिवसैनिक आलेच असते तिकडे....या राज्यात नामर्दांचं सरकार चालू आहे.” अशा शब्दांत राऊतांनी सरकारवर आगपाखड केली.

काही महीन्यांपुर्वी राष्ट्रवादीच्य़ा खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी अब्दुल सत्तार यांनी केलेल्या विधानाची आठवण करून देताना त्यांनी शिंदे गटाला लक्ष्य केलं. ते म्हणाले, “सुप्रिया सुळेंविषयी अब्दुल सत्तारांनी काय भाषा वापरली ? शिंदे गटाचे आमदार सुर्वेंनी तंगड्या तोडण्याची भाषा केली होती. काय कारवाई झाली? त्यांच्या मुलानं एका बिल्डरचं अपहरण केलं. त्यावर काय कारवाई केली गेली? भाजपा आणि मिंधे गटाचे आमदार ज्या प्रकारची भाषा वापरत आहेत, त्यांच्यावर काय कारवाई केली?” असा रोखठोक सवाल राऊतांनी केला.
राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारवर टिका करताना ते म्हणाले, “राज्यात दोन प्रकारचे कायदे असून गद्दारांसाठी वेगळा आणि जनतेसाठी वेगळा. आम्ही राज्यपालांना त्याबाबत नक्कीच विचारू. ज्या शब्दासाठी दळवींना अटक झाली, तो चित्रपटांमध्ये वापरला जातो. आनंद दिघेंच्या तोंडीही चित्रपटात तो शब्द आहे. त्यामुळे दळवींवर कारवाई करून तुम्ही ज्यांना गुरू मानता, त्यांचा अपमानच करताय.” असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दुसऱ्या राज्यांमध्ये प्रचारात सक्रिय असल्यावर संजय़ राऊतांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले,“राज्यात अवकाळीचं संकट कोसळत असताना आपल्या राज्याचे सुलतान आणि डेप्युटी सुलतान तेलंगणात प्रचारात व्यग्र होते. कुणी छत्तीसगडमध्ये...कुणी तेलंगणात...जणूकाही ते गेले नसते तर निवडणुका थांबल्या असत्या. त्यांची मुख्य जबाबदारी होती इथून खोके नेऊन तिथल्या लोकांना सुपूर्त करायची. पण आपली ११ कोटी जनता संकटात असताना त्याबाबतीत त्यांना कोणतीही चिंता नाही.” असेही राऊत म्हणाले.

Advertisement
Tags :
Datta DalviMP Sanjay Rautstrongly criticizedtarun bharat newsThackeray group
Next Article