महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

या ‘क्लास’मध्ये मिळतात डेटिंगचे धडे

06:22 AM Sep 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शिकवण्या किंवा क्लासेस अनेक प्रकारचे असतात हे सर्वांना माहित आहे. दहावीचे कलासेस, बारावीचे क्लासेस, अनेक प्रवेश परिक्षांचे क्लासेस, पोहण्याचे क्लासेस, इतकेच नव्हे, तर बागकाम कसे करावे, झाडांची कलमे कशी करावीत, विविध प्रकारचे खेळ कसे खेळावेत, इत्यादी प्रशिक्षण देणाऱ्या केंद्रांची किंवा क्लासेसची सध्या चलती आहे. सध्याचे युग व्यावसायिकत्वाचे आहे. त्यामुळे ‘स्पेशलायझेशन’ला महत्व आहे, अर्थातच असे क्लासेस जोरात चालतात.

Advertisement

तथापि, निदान भारतात तरी, काही विषय हे जाहीर चर्चेचेही मानले जात नाहीत. स्त्री-पुरुष संबंध हा गुप्तच ठेवण्याचा विषय असतो. त्याची उघडपणे चर्चा करणेही निषिद्ध मानले जाते. मग असे संबंध कसे ठेवावेत, याचा ‘क्लास’ ही बाब तर दूरच राहिली. भारतातच नव्हे, तर काही प्रगत मानल्या जाणाऱ्या देशांमध्येही अशा संबंधांवर जाहीररित्या व्यक्त होणे असभ्यपणाचे मानले जाते.

Advertisement

तथापि, ऑस्टेलिया या देशात ‘डेटिंग’ कसे करावे याचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणारा क्लास काढला आहे. तिचे नाव एलिसिया डेव्हीस असे असून ती स्वत: एक ‘मॉडेल’ आहे. तिचा क्लास ऑनलाईन आहे. ती पुरुषांना महिलांसमवेत डेटिंग करण्यात साहाय्यही करते. डेटिंग करत असताना काय करावे, काय करु नये, काय बोलावे, काय बोलू नये, तसेच महिलांना पुरुषांकडून कोणत्या वर्तनाची अपेक्षा असते, त्यांना काय आवडत नाही, या साऱ्याचे शिक्षण या क्लासमध्ये मिळते. तिचे म्हणणे असे, की अगदी मुक्त मानल्या जाणाऱ्या पाश्चात्य देशांमध्येही अनेक पुरुषांना त्यांना आवडणाऱ्या महिलांशी संवाद साधण्याची हिंमत होत नाही. त्यामुळे त्यांची मनातल्या मनात कोंडी होते. आपल्या क्लासमुळे त्यांची भीड चेपते. त्यामुळे त्यांना डेटिंगचा आनंद घेता येतो. साहजिकच, तिच्या या क्लासमध्ये ‘विद्यार्थी’ मोठ्या प्रमाणात आहेत आणि तिची कमाईही बख्खळ आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article