For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्ट्रेलियन अभिनेत्रीला करतोय डेट

07:00 AM Feb 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑस्ट्रेलियन अभिनेत्रीला करतोय डेट
Advertisement

देव पटेल हा हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता असून त्याने स्वत:च्या अभिनयाद्वारे लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मूळचा ब्रिटिश नागरिक असलेल्या देवने 2007 मध्ये स्वत:ची कारकीर्द सुरू केली होती. परंतु डॅनी बॉयल यांच्या 2008 मध्ये प्रदर्शित ‘स्लमडॉग मिलिनेयर’मध्ये त्याने साकारलेल्या ‘जमाल मलिक’ या भूमिकेला मोठी पसंती मिळाली होती. देव आता लवकरच स्वत:च्या प्रेयसीसोबत विवाह करणार आहे. देव लवकरच प्रेयसी टिल्डा कोबम-हार्वेसोबत विवाह करणार आहे. टिल्डा ही ऑस्ट्रेलियन असून ती देखील अभिनेत्रीच आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी देव पटेलला आता विवाहासाठी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. देव आणि टिल्डा मागील 7 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. तसेच या दोघांना अनेकदा एकत्र पाहिले गेले आहे. तर देव यापूवी फ्रीडा पिंटोसोबत रिलेशनशिपमध्ये होता, देवसोबत ब्रेकअप झाल्यावर तिने मूव्ह ऑन होत दुसऱ्यासोबत संसार थाटला आहे. देव पटेल लवकरच मंकी मॅन या हॉलिवूड चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यानेच केले आहे. हा चित्रपट भारतीय पार्श्वभूमीवर आधारित असणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.