भारतापेक्षा विदेशात 10 पट डेटा महाग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 8 व्या ‘ इंडिया मोबाईल काँग्रेस’च्या कार्यक्रमातून संवाद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे ‘इंडिया मोबाइल काँग्रेस’च्या आठव्या आवृत्तीचे उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले की, आज इतर देशांतील मोबाईल डेटाची किंमत भारताच्या तुलनेत दहापट जास्त आहे. जगाला जोडणे हे भारताचे ध्येय आहे. या टेक इव्हेंटमध्ये जगभरातील 120 हून अधिक देश सहभागी होत आहेत. 400 हून अधिक प्रदर्शक आणि सुमारे 900 स्टार्टअप देखील सहभागी झाले आहेत. आयएमसी 2024 प्रदर्शनात पंतप्रधान नरेंद्र मोदींना टेक इनोव्हेशन्स दाखवण्यात आले. पंतप्रधानांसोबत केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधियाही उपस्थित होते.
मोदींनी जागतिक दूरसंचार मानकीकरण असेंब्ली (sंऊएA) 2024 चे उद्घाटन देखील केले, जे भारत आणि आशिया-पॅसिफिक प्रदेशात प्रथमच आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाद्वारे आयोजित केले जात आहे. 190 हून अधिक देशांतील 3,000 हून अधिक प्रतिनिधी यात सहभागी झाले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली.
पंतप्रधानांच्या भाषणाचे 6 मुद्दे
गेल्या दहा वर्षांत भारताने जे ऑप्टिकल फायबर टाकले आहे, ते चंद्र आणि पृथ्वीमधील अंतराच्या आठपट जास्त आहे. दोन वर्षांपूर्वी आम्ही 5 जी लाँच केले. आज प्रत्येक जिल्हा 5जीशी जोडला गेला आहे. आता आम्ही 6 जी तंत्रज्ञानावरही वेगाने काम करत आहोत.
दूरसंचार क्षेत्रातील सुधारणांमुळे इंटरनेट डेटाच्या किमतीत घट झाली आहे. आज भारतात मोबाईल डेटाची किंमत 12 सेंट्स प्रति जीबी आहे. एक जीबी डेटा इतर देशांमध्ये दहापट महाग आहे. आज भारतीय लोक दर महिन्याला सरासरी 30 जीबी डेटा वापरतात.
आम्ही भारतात बनवल्याशिवाय फोन स्वस्त होऊ शकत नाहीत. 2014 मध्ये, फक्त दोन मोबाइल उत्पादन युनिट होते. आज ते 200 पेक्षा जास्त आहे. पूर्वी आपण परदेशातून स्मार्टफोन आयात करायचो. आता, आम्ही भारतात सहापट अधिक फोन बनवतो.
जन धन, आधार आणि युपीआयची उदाहरणे देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, ओएनडीसी डिजिटल कॉमर्स क्षेत्रात क्रांती घडवून आणेल. मोदी म्हणाले, आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मने जीवन कसे सोपे केले आहे हे आम्ही कोविड-19 दरम्यान पाहिले आहे.
आज भारत दूरसंचार आणि संबंधित तंत्रज्ञानाच्या बाबतीत जगातील सर्वाधिक घडणाऱ्या देशांपैकी एक आहे. भारतात 120 कोटी किंवा 1200 दशलक्ष मोबाईल फोन वापरकर्ते आहेत. भारतात 95 कोटी किंवा 950 दशलक्ष इंटरनेट वापरकर्ते आहेत. जगातील रिअल-टाइम डिजिटल व्यवहारांपैकी 40 टक्केपेक्षा जास्त भारताचा वाटा आहे.
प्राचीन रेशीम मार्गापासून ते आजच्या तंत्रज्ञान मार्गापर्यंत, भारताचे ध्येय नेहमीच जगाला जोडणे आणि नवीन मार्ग उघडणे हे राहिले आहे. अशा प्रकारे sंऊएA आणि घ्श्ण् ची भागीदारी देखील एक प्रेरणादायी आणि उज्ज्वल संदेश आहे. जेव्हा स्थानिक आणि जागतिक जुळते तेव्हा संपूर्ण जगाला त्याचा फायदा होतो. हे आमचे ध्येय असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे.