महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कंग्राळी परिसरात भक्तिभावाने दसरोत्सव साजरा

12:51 PM Oct 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक

Advertisement

कंग्राळी खुर्द गावासह परिसरातील सर्व गावात दसरोत्सव पारंपरिक पद्धतीने व मोठ्या भक्तिभावाने ग्रामदैवतांच्या ठिकाणी धार्मिक विधी करून साजरा करण्यात आला. या निमित्ताने कंग्राळीत दशमीदिवशी कलमेश्वर पालखी आणि जोतिबाची सासनकाठी, मानाची तलवार, त्रिशूळ ग्रामदैवत श्री कलमेश्वर मंदिराच्या आवारात नगारा, हलगी, सनई व अन्य पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणण्यात आले. भाविकांच्या उपस्थितीत विधिवत पूजन झाल्यानंतर गाऱ्हाणा होऊन पालखी व सासनकाठी आपट्याच्या झाडाखाली नेण्यात आली. तेथे पुन्हा विधिवत पूजन होऊन करून गावातून पालखी व सासनकाठीसह सीमेवरील नागनाथ या देवस्थानांच्या ठिकाणी जाऊन धार्मिक विधी व गाऱ्हाणे झाले. त्यानंतर गावच्या प्रवेश सीमेवर पुन्हा पारंपरिक विधी होऊन पालखी, सासनकाठी व शस्त्रांची फाटाफूट होऊन गावात मिरवणुकीने  फिरविण्यात आली. त्यानंतर देव मंदिरात नेऊन कुलूपबंद करण्यात आले. रात्री 9 वाजेपर्यंत ग्रामस्थांनी एकमेकांना आपट्याच्या झाडाची पाने सोने म्हणून देऊन सोन्याप्रमाणे राहण्याच्या शुभेच्छा दिल्या.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article