For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बद्रीनाथ धाम येथे 12 मेपासून सुरू होणारदर्शन

06:34 AM Feb 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
बद्रीनाथ धाम येथे 12 मेपासून सुरू होणारदर्शन
Advertisement

वसंत पंचमीच्या दिनी शूभ मुहूर्ताची घोषणा

Advertisement

वृत्तसंस्था/ देहरादून

उत्तराखंडमधील प्रतिष्ठित चारधाम यात्रेतील मुख्य यात्रा बद्रीनाथ धाम यात्रा कधीपासून सुरू होणार याची घोषणा करण्यात आली आहे. 12 मेपासून बद्रीनाथ यात्रा सुरू होणार आहे. चार धाम यात्रेची सुरुवात अक्षय्य तृतीयेपासून होते. यंदा अक्षय्य तृतीया 10 मे रोजी आहे, यामुळे गंगोत्रीधाम आणि यमुनोत्री धाम येथील दर्शन 10 मेपासून सुरू होणार आहे. गंगोत्री आणि यमुनोत्री येथील दर्शन सुरू झाल्यावरच केदारनाथ आणि बद्रीनाथ धाममध्ये कधीपासून दर्शन सुरू होणार याची घोषणा केली जात आहे. दरवर्षी वसंत पंचमीला याच्या तारखेची घोषणा होत असते. बद्रीनाथ यात्रेच्या तिथीची बुधवारी घोषणा करण्यात आली आहे.

Advertisement

बद्रीनाथ धामचे कपाट 12 मे रोजी 6 वाजता ब्रह्ममुहूर्ताला खोलले जाणार असल्याचे महाराज मन्युज्येंद्र शाह यांनी सांगितले आहे. आता केदारनाथ धामच्या यात्रेच्या तिथीची घोषणा लवकरच केली जाणार आहे. 14 मेपर्यंत केदारनाथ यात्रा सुरू होण्याचा अनुमान व्यक्त केला जात आहे. विधिवत पद्धतीने महाशिवरात्रीच्या दिनी केदारनाथ यात्रेच्या तिथीची घोषणा केली जाणार आहे.

Advertisement
Tags :

.