भारत गुंतवणुकीसाठी सर्वात ‘आकर्षक’
देशातील सौरक्रांती हे सुवर्णपान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुजरातमध्ये प्रतिपादन
► वृत्तसंस्था / गांधीनगर
बहुविधता, लोकसंख्या, आकारमान, क्षमता आणि प्रतिभा या साऱ्या दृष्टींनी भारत हा सर्वाधिक वैशिष्ट्यापूर्ण देश आहे. त्यामुळे 21 व्या शतकात तो गुंतवणुकीसाठी सर्वात आकर्षक देश बनला आहे. आम्ही केलेली सौरक्रांती हे आमच्या वर्तमानातील एक सुवर्णपृष्ठ आहे, अशी भलावण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ते गांधीनगर येथे आयोजित चौथ्या जागतिक पुनउ&पयोगी ऊर्जा गुंतवणूकदार संम्मेलन आणि प्रदर्शन कार्यक्रमात भाषण करीत होते. याशिवाय सोमवारी त्यांच्या हस्ते अनेक वंदे भारत रेल्वेगाड्यांचा शुभारंभ करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सलग तिसऱ्या केंद्र सरकारने नुकताच आपला 100 दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे. याचाही उल्लेख त्यांनी केला. या 100 दिवसांमध्ये आमच्या सरकारने देशाची प्रगती वेगाने व्हावी, यासाठी सर्वच क्षेत्रांमध्ये स्पृहणीय कामगिरी केली आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी अन्य एका कार्यक्रमात भारतातील प्रथम ‘वंदे मेट्रो’चा प्रारंभही केला. ही मेट्रो भूज ते अहमदाबाद अशी धावणार आहे. ही भारतातील प्रथमच अशा प्रकारची मेट्रो आहे. याशिवाय त्यांनी गृहनिर्माण योजनेच्या अंतर्गत निर्माण केलेल्या 30 हजार घरांचेही राष्ट्रार्पण केले. त्यांच्याहस्ते अनेक विकास योजनांचे उद्घाटन करण्यात आले.
ऊर्जेची आवश्यकता वाढणार
येत्या 23 वर्षांमध्ये, अर्थात 2047 पर्यंत भारत विकसीत देश होणार आहे. त्यामुळे भारताची ऊर्जेची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. भारताकडे खनिज तेल किंवा नैसर्गिक वायूचे मोठे साठे नाहीत. त्यामुळे भारत ऊर्जास्वतंत्र देश नाही. आम्हाला ऊर्जेसाठी इतर देशांवर अवलंबून रहावे लागते. ही अवलंबित्व कमीत कमी ठेवण्यासाठी भारताला आपला भविष्यकाळ सौरऊर्जा, वायूऊर्जा, अणुऊर्जा आणि जलऊर्जा अशा स्रोतांमध्ये पहावा लागणार आहे. हे स्रोत विकसीत करण्यासाठी आम्ही सर्व शक्ती पणाला लावून प्रयत्नशील आहोत. मोठ्या योजना आमच्यापाशी आहेत, अशीही मांडणी त्यांनी आपल्या भाषणात केली.
भारताचे मानवबळ समर्थ
भारताकडे प्रतिभा आणि प्रज्ञा यांची भरपूर उपलब्धी आहे. आमची क्षमता आणि मानवबळ हे आमचे सर्वात मोठे वैशिष्ट्या आहे. याच बळाच्या आधारावर भारत जगाला बरेच काही देऊ शकतो. आज साऱ्या जगालाही भारताच्या या अफाट सामर्थ्याचा प्रत्यय येत आहे. म्हणूनच आज भारत 21 शतकातला सर्वात आकर्षक देश ठरला आहे. आपण सर्वांनी प्रयत्नपूर्वक या स्थितीचा लाभ देशाला मिळेल अशी व्यवस्था केली पाहिजे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
सरकारचा वेग प्रचंड
आपल्या सरकारच्या कामाचा वेग आणि उरक प्रचंड आहे. आम्ही सात कोटी घरे गरीबांसाठी निर्माण करण्याचा संकल्प सोडला होता. केवळ पाच वर्षांमध्ये यांपैकी चार कोटी घरे बांधून पूर्ण झाली आहे. ऊर्वरित 3 कोटी घरे या कार्यकाळात पूर्ण केली जाणार आहेत. महामार्ग, बंदरे, ऊर्जाप्रकल्प, जलस्रोत विकास, विमानतळ, संरक्षण पायाभूत सुविधा आदी क्षेत्रांमध्ये आम्ही आजवर झाली नव्हती, एवढी कामे करुन दाखविली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
हरित ऊर्जा क्षेत्रात प्रगती
हरित ऊर्जा क्षेत्र भारताला वेगाने प्रगतीच्या मार्गावर नेणार आहे. सौरऊर्जा आणि हरित हैड्रोजन उत्पादन क्षेत्रात आम्ही वेगाने प्रगतीपथावर आहोत. हरित हैड्रोजन अभियानासाठी 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत आहे. सौरऊर्जेचा लाभ भारतातील शेतकरी, छोटी घरे आदींना होत आहे. प्रभू रामचंद्रांचे जन्मस्थान असणारे अयोध्या शहर आम्ही ‘सौरनगर’ म्हणून विकसीत करत आहोत. स्वच्छ ऊर्जेचा उपयोग करुन प्रदूषण घटविण्याची प्रतिज्ञा घेणारा भारत जी-20 परिषदेतील प्रथम देश ठरला आहे. आम्ही स्वच्छ ऊजा निर्मितीचा ध्यास घेतला आहे. पृथ्वी नेहमी सजीवांना राहण्यायोग्य रहावी, असे आमचे ध्येय आहे. त्यामुळे पुनउ&पयोगी ऊर्जा क्षेत्राशी संबंधित असलेले सर्व विभाग आणि सर्व क्षेत्रे आम्ही कार्यरत केली आहेत, असे प्रतिपादन त्यांनी या कार्यक्रमात केले.
‘नमो’ भारत वेगवान रेल्वे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी गुजरातमधील भूज ते अहमदाबाद या मार्गावरील वंदे मेट्रोचा प्रारंभ करण्यात आला. या मेट्रोला नवे नाव देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. आता ही मेट्रो वंदे मेट्रोच्या स्थानी ‘नमो भारत वेगवान रेल्वे’ या नावाने ओळखली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
अनेक वंदे भारत गाड्यांचा आरंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी नागपूर ते सिकंदराबाद, कोल्हापूर ते पुणे, आग्रा छावणी ते बनारस, दुर्ग ते विशाखापट्टणम, पुणे ते हुबळी आणि वाराणसी ते दिल्ली, अशा पाच नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांचा प्रारंभ करण्यात आला आहे. तसेच, त्यांच्या हस्ते कच्छमधील विद्युत निर्मिती केंद्रांचेही उद्घाटन करण्यात आले. गुजरातसाठी एकंदर 8 हजार कोटी रुपयांचे हे प्रकल्प आहेत.
अनेक मोठ्या प्रकल्पांचा प्रारंभ
ड गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक प्रकल्पांचा प्रारंभ
ड भारतातील प्रथम नमो भारत वेगवान रेल्वेचा करण्यात आला शुभारंभ
ड हरित ऊर्जा क्षेत्रात जगात अग्रगण्य होण्यासाठी भारताचे आहेत प्रयत्न