महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दर्शनला बळ्ळारीला तर प्रदूषला हिंडलग्यात हलविणार

12:05 PM Aug 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उर्वरित साथीदारांचीही वेगवेगळ्या कारागृहात रवानगी

Advertisement

बेळगाव : बेंगळूर येथील परप्पन अग्रहार कारागृहात चित्रपट अभिनेता दर्शन व त्याच्या साथीदारांची बडदास्त ठेवल्याची छायाचित्रे प्रसारित झाल्यानंतर दर्शन व त्याच्या साथीदारांना परप्पन अग्रहारमधून हलविण्यात आले असून बेळगावसह राज्यातील वेगवेगळ्या कारागृहात त्यांना स्थानबद्धतेत ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. चित्रदुर्ग येथील रेणुकास्वामी खून प्रकरणात दर्शन व त्याच्या 17 साथीदारांना बेंगळूर पोलिसांनी अटक केली आहे. परप्पन अग्रहार कारागृहात या सर्व आरोपींना स्थानबद्धतेत ठेवण्यात आले होते.

Advertisement

एखाद्या रिसॉर्टमध्ये गप्पा मारत बसल्याप्रमाणे दर्शन व बेंगळूरमधील काही गुंड कारागृहात खुर्चीवर बसून कॉफी पितानाचे व धूम्रपान करतानाची छायाचित्रे प्रसारित झाली होती. या छायाचित्रांमुळे सरकारवर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथके नियुक्त करण्यात आली असून कारागृह विभागाच्या नऊ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दर्शनला बेळगावात आणणार, अशी माहिती उपलब्ध झाली होती. मात्र, सध्याच्या माहितीनुसार दर्शन व त्याच्या साथीदारांना एकाच कारागृहात न ठेवता प्रत्येकाला वेगवेगळ्या कारागृहात हलविण्याचा निर्णय झाला आहे.

दर्शनचा साथीदार प्रदूष याला हिंडलगा कारागृहात हलविण्यात येणार आहे. यासाठी कारागृह विभागाने तयारी केली आहे. तर दर्शनला बळ्ळारी कारागृहात हलविण्यात येणार आहे. एक-दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. दर्शनची बडदास्त कारागृह अधिकाऱ्यांना चांगलीच भोवली आहे. दर्शनला घरचे जेवण देण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने ही मागणी फेटाळली आहे. दर्शनची बडदास्त ठेवण्यासाठी बेंगळूरमधील गुन्हेगारी टोळ्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. विल्सन गार्डन नागाने दर्शनची कारागृहात व्यवस्था केली होती. विल्सन गार्डन नागाचा साथीदार वेलू नामक एका गुंडाने त्याचा फोटो काढून तो आपल्या पत्नीला पाठवला आहे. तेथून हा फोटो व्हायरल झाल्याची माहिती मिळाली आहे. दर्शनला बळ्ळारी, प्रदूषला बेळगाव तर उर्वरित कैद्यांना शिमोगा, धारवाड, विजापूर, म्हैसूर, गुलबर्गा, तुमकूर कारागृहात हलविण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article