महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वादळी पावसातही घडवले श्रीबालाजीचे दर्शन

06:58 AM Dec 13, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्री देवदर्शन’मधील यात्रेकरुंचे उद्गार

Advertisement

फातोर्डा / प्रतिनिधी

Advertisement

मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा योजनेअंतर्गत 8 रोजी गोव्यातून तिरुपती येथे गेलेल्या हजारो यात्रेकरूंना सुखरूप देवदर्शन करून परत आणल्याबद्दल सर्वांनी मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा योजनेची व्यवस्था पाहणाऱयांचे आभार मानले आहेत.

तिरुपती येथे नुकत्याच सुरू झालेल्या वादळी वारे आणि  मुसळधार पाऊस यामुळे सर्वांचीच पंचाईत झाली होती. तिरुपती येथे टेनमधून बाहेर पडल्याबरोबर? प्रत्येक यात्रेकरुला ताबडतोब एक एक छत्री देण्यात आली. बसमधून सुखरूपपणे हॉटेलवर पोहोचवण्यात आले. तेथून बालाजीच्या दर्शनासाठी सर्वजण निघाले परंतु जोरदार पावसामुळे दर्शन होऊ शकले नाही. त्यामुळे सर्वांना संपूर्णपणे भिजलेल्या अवस्थेत सुखरूपपणे हॉटेलवर परत आणण्यात आले.

 आजारी यात्रेकरुंवर तातडीने उपचार

 काही वयस्कर यात्रेकरूंची तब्येत बिघडली. त्यांना त्वरित ?म्ब?लन्समधून हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांच्यावर उपचार करून त्यांना परत हॉटेलमध्ये सोडण्यात आले. या मुसळधार पावसाच्या गडबडीत एक वयस्कर महिला हरवली.

 दिगंबर कामतनी घेतली सगळी काळजी

 ही गोष्ट ज्यावेळी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना समजली त्यावेळी त्यांनी ताबडतोब तिला शोधण्यासाठी पोलिस फोर्सला शोध मोहिमेच्या कामाला लावल.s? ते स्वतः त्यांच्या मुलाबरोबर संपूर्ण रात्र जागे राहून तिथल्या परिस्थितीची ते चौकशी करत होते. पोलिसांच्या अथक परिश्रमानंतर ती महिला सुखरूप रित्या सापडली.

 अशक्य वाटत होते श्रीबालाजी दर्शन

 मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि कित्येकांचे आजारपण, वयस्कर महिलेचे हरवणे या सर्व परिस्थितीत सर्वांनी बालाजी दर्शनाची आशा सोडून दिली होती. अशा गडबडीत तो दिवस वायाच गेला परंतु दुसऱया दिवशी सर्वांना बालाजीचे दर्शन मिळावे यासाठी दिगंबर कामत यांनी प्रयत्न केले. कामत यांनी श्री बालाजी देवस्थानच्या चेअरमनशी वैयक्तिकरित्या संपर्क साधून स्पेशल पासची व्यवस्था करून यात्रेकरूंना व्हीआयपी रांगेतून 3 ते 4 तासात निवांतपणे  आणि व्यवस्थितपणे देव बालाजीचे  दर्शन घडवले. त्यामुळे सर्वांनीच त्यांचे आभार व्यक्त केले.

 टीकाकारांनी पसरविल्या खोटय़ा बातम्या

 ज्यावेळी तिरुपतीला वादळी वारा आणि मुसळधार पाऊस आला आहे, हे समजले त्यावेळी आमदार दिगंबर कामत त्यांचा पुत्र योगीराज आणि त्यांच्या पत्नी आशा रात्रभर  फोनवरून यात्रेकरूंच्या संपर्कात होते. या यात्रेत काही टीकाकारही होते त्यांनी नकारात्मक अफवा पसरवली व लोकांची दिशाभूल केली. त्यामुळे अशा बातम्या वर कोणीही विश्वास ठेवू नये व इच्छुकांनी पुढील यात्रेचा लाभ घ्यावा असे यात्रा करून आलेल्या यात्रेकरूंनी सांगितले. वादळी वारा आणि मुसळधार पाऊस या व्यतिरिक्त आम्हाला आणखी कुठलाही त्रास झाला नाही असे यात्रेकरू म्हणाले. 

 यात्रेकरुंसाठी सर्व व्यवस्था उत्कृष्ट

 सर्व यात्रेकरूंची चहा पाण्याची नाश्त्याची दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाची सोय रेल्वेने अतिशय व्यवस्थितपणे रुचकर जेवण देऊन उत्कृष्टपणे बजावली. शेवटच्या दिवशी रात्रीचे जेवणसुद्धा रात्री 3 वाजेपर्यंत रेल्वेतील कर्मचारी हसतमुखाने देत होते. या सर्व गडबडीत रात्री 9 वाजता सुटणारी टेनला कामत यांनी 11.30 वाजता सोडण्यास सांगितली होते. परंतु सर्वांचे देवदर्शन दर्शन होईपर्यंत आणि सर्वजण सुखरूपरित्या स्टेशनवर पोहोचेपर्यंत उशीर झाल्यामुळे आमदार दिगंबर कामत यांनी रेल्वे डिपार्टमेंटला पुन्हा फोन करून रेल्वे रात्री 11.30. ऐवजी 2 वाजता सोडण्यास सांगितले. त्यामुळे रेल्वे गाडी 2 वाजता सोडण्यात आली आणि दि 11 रोजी संध्याकाळी 7 वाजता सर्व यात्रेकरूंना मडगाव स्टेशनवर सुखरूपपणे पोहोचविण्यात आले. यासाठी मुख्यमंत्री देवदर्शन योजनेच्या सर्व टीमकडून मुख्यमंत्री प्रमोद सावंत, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना यात्रेकरुंन धन्यवाद दिले.

मुख्यमंत्री देवदर्शन’मधील यात्रेकरुंचे उद्गार

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article