For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

14 हजार भाविकांकडून बाबा बर्फानीचे दर्शन

06:18 AM Jul 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
14 हजार भाविकांकडून बाबा बर्फानीचे दर्शन
Advertisement

अमरनाथ यात्रा भाविकांमध्ये उत्साहाची लाट : नोंदणीसाठी गर्दी

Advertisement

वृत्तसंस्था/ जम्मू

बाबा बर्फानी यांच्या दर्शनासाठी दरवषी काढण्यात येणाऱ्या पवित्र अमरनाथ यात्रेला शनिवारपासून सुऊवात झाली. पहिल्या दिवशी 14 हजार यात्रेकरूंनी अमरनाथ गुहेत बाबा बर्फानीचे दर्शन घेतले. 52 दिवसांचा हा प्रवास 19 ऑगस्टला संपणार आहे. अमरनाथ यात्रेचा रविवार, 30 जून हा दुसरा दिवस होता. यादरम्यान, 6 हजार 619 भाविकांची तिसरी तुकडी रविवारी जम्मूतील भगवती नगर बेस पॅम्प येथून रवाना झाली. यावषी अमरनाथ यात्रेसाठी 3.50 लाखांहून अधिक लोकांनी नोंदणी केली असून अजूनही प्रचंड संख्येने लोक प्रतिक्षेत आहेत.

Advertisement

 

अमरनाथच्या दिशेने रविवारी निघालेल्या तिसऱ्या तुकडीत 1,141 महिलांचा समावेश होता. ते सर्व 319 गाड्यांमधून पहाटे 3.50 वाजता निघाले. आतापर्यंत 3,838 यात्रेकरू चंदनवाडी, पहलगाम मार्गावरून तर 2,781 यात्रेकरू बालटाल मार्गावरून हिम-शिवलिंगाच्या दर्शनासाठी निघाले आहेत. ही यात्रा अनंतनागमधील पारंपारिक 48 किमी लांबीच्या नुनवान-पहलगाम मार्गाने आणि गांदरबलमधील 14 किमी लांबीच्या बालटाल मार्गावरून जाणार आहे. अनंतनाग जिह्यातील 3 हजार 880 मीटर उंचीवर असलेल्या बाबा बर्फानीला भेट देणार आहे.

त्रिस्तरीय सुरक्षा तैनात

अमरनाथ यात्रेसाठी त्रिस्तरीय सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. पोलिसांची 13, एसडीआरएफची 11, एनडीआरएफची आठ, बीएसएफची चार आणि सीआरपीएफची दोन पथके दोन्ही मार्गावरील उच्च सुरक्षा बिंदूंवर सज्ज आहेत. याशिवाय निमलष्करी दलाच्या 635 कंपन्या तैनात आहेत. ट्रॅफिक मॉनिटरिंगसाठी उधमपूर ते बनिहालपर्यंत 10 हाय-एंड पॅमेरे बसवण्यात आले आहेत.

कारचा अपघात : 2 जणांची प्रकृती चिंताजनक

पहलगामजवळील चंदनवाडी येथे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या कारला रविवारी अपघात झाला. यामध्ये दोन भाविक गंभीर जखमी झाले. झारखंड येथील विजय मंडल आणि गुरवा देवी अशी जखमींची नावे आहेत. बीएसएफने दोघांनाही डीआरडीओ ऊग्णालयात उपचारासाठी आणले. यानंतर त्यांना अनंतनाग येथील जीएमसी ऊग्णालयात रेफर करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.