For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आंतरराष्ट्रीयस्तरावर फडकावला दापोलीचा झेंडा

06:00 AM Sep 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
आंतरराष्ट्रीयस्तरावर फडकावला दापोलीचा झेंडा
Advertisement

आदी भांबीडचे लाठी-काठी क्रीडाप्रकारात दैदिप्यमान यश,कराटेसह मल्लखांबमध्ये राज्यस्तरावर चमक

Advertisement

 - प्रतिक तुपे, दापोली

लहान वयातच मुलांवर मैदानी खेळाचे संस्कार होत राहीले तर ही मुले मैदाने गाजवतात व पुढेही गाजवत रहातील याचा प्रत्यय दापोलीच्या आदी भांबीड या 12 वर्षीय खेळाडूने दाखवून दिला आहे. आदीने दापोलीचा झेंडा लाठीकाठी या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीयस्तरावर रोवला आहे. शिवाय त्याने लाठीकाठी, कराटे मल्लखांब या स्पर्धेत राज्यस्तरावर तालुक्याचे नाव कोरले आहे. दापोली शहरालगत असलेल्या जालगाव-पांगारवाडी गावातील आदी अमर भांबीड याने 2021पासून क्रीडाक्षेत्रात पदार्पण केले. त्याने नेहमी आपल्या लाठीकाठीच्या सरावरासाठी सज्ज राहून आज त्याने आपल्या तालुक्याचे, गावाचे नाव आंतरराष्ट्रीयस्तरापर्यंत पोहोचवले आहे. इ. 5वीमध्ये शिक्षण घेत असताना त्याने लाठीकाठीत या क्रीडा प्रकारात सहभाग घेतला. प्रथम नाशिक येथे झालेल्या स्पर्धेत सहभाग घेत यश मिळविले. त्यानंतर दिल्ली व नंतर दापोलीतील राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळवून पदके आपल्या पदरात पाडून घेतली. त्यानंतर गोवा येथे झालेल्या आंतराष्ट्रीयस्तरीय स्पर्धेत देखील आपला दबदबा दाखवून देत दापोलीसह आपल्या यशाचा झेंडा मजबूत यशासह रोवला.

Advertisement

आदी शहरातील ए. जी. हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. सध्या तो सहावीमध्ये शिकत आहे. शिक्षणात तो हुशार असतानाच मैदानी, श्रमदायी खेळांमध्ये अग्रेसर आहे. लाठीकाठीमध्ये त्याने तीन वेळा राज्यस्तरीय रौप्य, कास्यपदक पटकावले. तर एकदा आंतराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे नेतृत्व करुन कास्यपदकाची कमाई केली. लाठीकाठी खेळात त्याला शिक्षक सुरेंद्र शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. शिवाय आदीने कराटेमध्ये येलो व ग्रीन ब्लॅड देखील मिळवले आहे. सध्या आदीने मल्लखांब या क्रीडा क्षेत्रात पदार्पण केले. मल्लखांबमध्येही त्याने राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेवून यश मिळवले. तर शालेय स्पर्धेत जिल्हास्तरावर यश मिळवल्याने विभागस्तरावर पुन्हा त्याची निवड झाली आहे. आदी हा या दोन क्रीडा प्रकारांवर थांबलेला नसून तो रनिंग अर्थात धावण्याच्या क्रीडा प्रकाराचा सराव करत आहे. वडील अमर व आई अक्षरा यांचा लहानपणापासून पाठींबा असून त्यांच्या आशीर्वादाने शिवाय क्रीडा प्रकारात सुरेंद्र शिंदे, विजय भुवड, गजानन भुवड यांच्या मार्गदर्शनाखाली अजून शक्य तेवढ्या स्पर्धांमध्ये सहभागी नोंदवून गावाचे व तालुक्याचे नाव उंचावण्याचे काम मला करायचे असल्याचे तो सांगतो. आदीला सैन्यात किंवा मर्चंड नेव्हीमध्ये काम करायचे असल्याने त्याची मेहनत आतापासून सुरू ठेवत आहे.

मोबाईलपेक्षा मैदानी खेळ मेहत्वाचा

सध्या मुलं मोबाईलमध्ये ऑनलाईन गेम खेळण्यात व्यस्त असताना आदी हा मैदानी खेळांना आपलेसे करत आहे. मोबाईलवर गेम खेळून आपल्यात काहीच बदल होणार नसून त्याचा आरोग्याला व आयुष्याला काहीच फायदा नसल्याचे देखील तो सांगतो. शिवाय लाठीकाठी, मल्लखांब तर रनिंगमध्ये किंवा प्रत्येकाच्या आवडत्या खेळामध्ये घोडदौड महत्वाची आहे. मैदानाकडे होणारे दुर्लक्ष हे भविष्यातले नुकसान असून मोबाईलवरचे गेम सोडून मैदानी गेम खेळण्याकडे लक्ष दिले तर उत्तम आरोग्य शिवाय आयुष्यात पुढे जाण्याची ताकद मिळते असे आदी सांगतो. एकंदरीत लहानपासूनच क्रिडाक्षेत्राची आवड निर्माण असेल तर भविष्यात विविध क्रीडा प्रकारांमध्ये आवड निर्माण होते हे आदीने लाठी काठी, मल्लखांब व आता रनिंगमध्ये असणाऱ्या रूचीतून स्पष्ट होते.

Advertisement
Tags :

.