विभागीय किक बॉक्सिंग स्पर्धेत दाणोली हायस्कूलचा डंका
विद्यार्थ्यांनी दोन सिल्वर पथकांसहित सात ब्रांच पदके पटकावली
ओटवणे प्रतिनिधी
सातारा येथे झालेल्या विभागीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत दाणोली येथील कै. बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालयाच्या ९ विद्यार्थ्यांनी नऊ पदके पटकावित या स्पर्धेत उज्वल यश संपादन केले. यात दोन सिल्वर पदांसह सात ब्रांझ पदकांचा समावेश आहे.
जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत दाणोली स्कूलचे २५ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामधील २२ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या या प्रशालेतील १४ विद्यार्थ्यांची सातारा येथील विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. सातारा येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुलनात घेण्यात आलेल्या या विभागीय स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी किक बॉक्सिंग स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले.या विभागीय किक बॉक्सिंग स्पर्धेत मुलांच्या गटातून या हायस्कूलमधील अमोल धोंडू पाटील आणि दत्ताराम प्रकाश दळवी यांनी सिल्वर मेडल तर प्रदीप गंगाराम जंगले, भागू बाजू जंगले, सुनील बाबुराव जंगले, विजय सुरेश जंगले यांनी ब्रांझ पदक पटकाविली. तसेच मुली मधून सलोनी अनंत सावंत, भक्ती सुरेश मोरजकर, सानिया हुसेन पटेल यांनी ब्रांझ मेडल पटकाविली. तर या स्पर्धेत ओंकार राऊळ जंगले, लक्ष्मण सुरेश जंगले, प्रियांका काशीराम जंगले, रंजना देऊ पाटील, वैभवी विठ्ठल दळवी यानीही चमकदार कामगिरी बजावली. मात्र त्यांना पदकापासून वंचित रहावे लागले. या हायस्कूलने अनेक विद्यार्थी यापूर्वी अनेक विभागस्तरीय क्रीडा स्पर्धेत या हायस्कूलचे अनेक विद्यार्थी चमकले. त्यामुळे किक बॉक्सिंग स्पर्धेत या स्कूलने यशाची परंपरा कायम राखली आहे. या सर्व यशस्वी खेळाडूंना प्रशालेचे शिक्षक आर. जी. पाटील आणि याच शाळेचा आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग खेळाडू हृतिक सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या हायस्कूल मधील खेळाडूंचा सर्व खर्चासाठी चौकुळचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे यांनी केला. या सर्व पदक प्राप्त विद्यार्थ्यांसह प्रशिक्षक रोहन पाटील यांचे शाळेचे मुख्याध्यापक जयवंत पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थ यांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.