जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत दाणोली हायस्कूलचे यश
ओटवणे | प्रतिनिधी
ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत दाणोली येथील कै बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालयाच्या कु. प्रियांका काशीराम जंगले या विद्यार्थिनीने १७ वर्षाखालील वेटलिफ्टिंग स्पर्धेमधील ४४ किलोखालील गटात ४२ किलो वजन उचलून प्रथम क्रमांक फटकाविला. या उत्कृष्ट कामगिरीमुळे तीची आता विभागीय वेट लिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तसेच या वेटलिफ्टिंग स्पर्धेत ६० किलो खालील गटात या प्रशालेच्या हनुमंत लक्ष्मण सावंत याने ९२ किलो वजन उचलून द्वितीय क्रमांक पटकावला. तर ५३ किलोखालील वजन गटात याच प्रशालेच्या रंजना देऊ पाटील हिने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच या प्रशालेच्या विजय सुरेश जंगले आणि सुनील बाबुराव जंगले यांनी या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले. या विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रिडा शिक्षक आर जी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष शरद नाईक व सदस्य विद्यालयाचे मुख्याध्यापक जयवंत पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ पालक यांनी अभिनंदन केले आहे.