सावंतवाडी राजवाडा परिसरातील धोकादायक झाडे तोडली
सामाजिक बांधिलकीने वेधले होते लक्ष
सावंतवाडी । प्रतिनिधी
येथील राजवाडा परिसरात रस्त्याच्या बाजूला असलेलेली धोकादायक झाडे तोडण्यात आली. वाहन मालक-चालकांसह नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. सामाजिक बांधिलकीच्या वतीने आणि सामाजिक संघटनांनी युवराज लखम राजे भोसले यांचे धोकादायक असलेले झाडांबाबत लक्ष वेधले होते .अखेर धोकादायक झाडे तोडल्याने सामाजिक बांधिलकी व टेपो चालक-मालक संघटनेने श्री. लखमराजे भोसले यांचे आभार मानले आहेत.
तीन महिन्यापूर्वी गणेश चतुर्थी सणात राजवाडा येथे रस्त्यावर पावसामध्ये भले मोठे झाड पडून आजिवडे येथील दोन तरुणांचा ते खासकीलवाड्यात भजन आटपून घरी परतत असताना भेलद्याचे झाड पडून बळी गेला होता सावंतवाडी शहर हादरून गेले होते.याबाबत पालिकेत बैठक झाली होती. बैठकीत परिसरात असलेली धोकादायक झाडे तोडण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. अखेर त्याची दखल घेऊन ती धोकादायक तोडण्यात आल्याने नागरिकांसह टेम्पो मालक संघटना व सामाजिक बांधिलकीच्या वतीने श्री लखमराजे भोसले यांचे आभार मानले आहेत.