धोकादायक खेळणी
खेळणी मुलांसाठी मनोरंजनाची साधनं असतात. यामुळे त्यांना शिकण्यास आणि त्यांच्या विकासात मदत होते. काही खेळणी मुलांना इतरांसोबत संभाषण आणि सामाजिक विकास घडवून आणण्यास मदत करतात. परंतु एक खेळणी मुलांसाठी अत्यंत धोकादायक ठरली आणि त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती.
गिल्बर्ट यू-238 आणिक ऊर्जा प्रयोगशाळा ही एक अशी खेळणी होती, जी 1950 च्या दशकाच्या प्रारंभी विकण्यात आली. ही एक रेडिओअॅक्टिव्ह खेळणी होती आणि तसेच लर्निंग सेटही होता. 49.50 डॉलरमध्ये मिळणाऱ्या या खेळणीत यूरेनियम ओरचे 4 सॅम्पल ऑट्यूनाइट, टॉर्बरनाइट, यूरेनिनाइट, कॉर्नोटाइट होते. तसेच यात एक गायगर काउंटर आणि वेगवेगळी काही अन्य अवजारे होती. गाइटर काउंटर कुठल्याही गोष्टीत किंवा वातावरणात रेडिएशन गणनेचे काम करते. या सेटसोबत लोकप्रिय ब्लोंडी कॉमिक स्ट्रिपद्वारे डॅगवूडवर आधारित एक कॉमिक बूकही आले होते, ज्याचे शीर्षक ‘लर्न हाउ डॅगवूड स्प्लिट्स द एटम’ आणि याला मॅनहटन प्रोजेक्टचे संचालक जनरल लेस्ली ग्रोव्ससोबत मिळून लिहिण्यात आले होते.
2006 साली आण्विक ऊर्जा प्रयोगशाळेला आतापर्यंतच्या 10 सर्वात धोकादायक खेळण्यांपैकी एक ठरविण्यात आले. या खेळणीला बाजारात सादर करण्याच्या एका वर्षातच यावर बंदी घालण्यात आली. कारण यामुळे लोकांचा जीव धोक्यात आला होता. ही खेळणी रेडिओअॅक्टिव्ह सामग्री म्हणजेच यूरेनियम 238, पोलोनियम 210, लेड 210 आणि रेडियम 226 सोबत प्रयोग करण्याची संधी देत होती. यामुळे मुलांना कॅन्सरचा धोका आणि गंभीर आरोग्य प्रश्न निर्माण होऊ लागले होते.
बंदी का घालण्यात आली?
या गेममध्ये उपकरणे आणि मॅन्युअल देखील होते. ज्याद्वारे मुलांना कशाप्रकारे अॅटोमिक गोष्टींविषयी शिकता येते, हे सांगण्यात येत होते. रेडिओअॅक्टिव्ह रेडिएशन अत्यंत धोकादायक असते, याकरता या गेममध्ये ग्लोव्स किंवा गाइडलाइन्स यासारख्या गोष्टी नव्हत्या. त्यावेळी यामुळे मुले गोष्टी शिकतील आणि विज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जातील असा विचार करण्यात आला होता, परंतु धोका पाहता यावर नंतर बंदी घालण्यात आली.