For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोगटे सर्कल येथे धोकादायक खड्डा

11:06 AM Sep 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोगटे सर्कल येथे धोकादायक खड्डा
Advertisement

ये-जा करणाऱ्या प्रवाशांना अडथळा

Advertisement

बेळगाव :गोगटे सर्कल येथे हेस्कॉमकडून दोन महिन्यांपूर्वी काढलेला खड्डा अद्यापही बुजविण्यात आलेला नाही. यामुळे रेल्वेस्थानक तसेच कॅन्टोन्मेंट बसस्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना अडथळा निर्माण होत आहे. रात्रीच्यावेळी खड्डा निदर्शनास येत नसल्याने मोठा अपघात होण्यापूर्वी खड्डा बुजविण्याची मागणी केली जात आहे.अंदाजे दोन महिन्यांपूर्वी हेस्कॉमच्या 33 केव्ही वीज वाहिनीत बिघाड झाल्याने ठिकठिकाणी खोदाई करण्यात आली हेती. 33 केव्ही ही वीज वाहिनी भूमिगत घालण्यात आली असल्याने गोगटे सर्कलच्या मध्यभागी तसेच रेल्वेस्टेशन रोडवर खड्डा काढून दुरुस्ती करण्यात आली. परंतु पुन्हा काही दिवसात बिघाड झाल्यामुळे बरेच दिवस दुरुस्तीचे काम सुरू होते. रेल्वेस्टेशन रोडवरील पदपथाला लागूनच खड्डा आहे. याठिकाणी रहदारी पोलीस, वाहनचालक तसेच प्रवाशांची नेहमीच ये-जा असते. त्यामुळे लवकर दुरुस्ती करून हा खड्डा बुजविण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.