कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बडमंजीनगरात धोकादायक वीजखांब

11:01 AM Feb 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : बडमंजीनगर, अनगोळ येथे विद्युतखांब कोसळण्याच्या स्थितीत आहे. काँक्रिटचा खांब पूर्णपणे निकामी झाला असून केव्हा कोसळेल, याची शाश्वती नाही. रेल्वेपुलानजीक नागरिक तसेच शेतकऱ्यांची ये-जा असते. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच या ठिकाणी नवा विद्युतखांब बसवावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. बडमंजीनगर परिसरात वस्ती वाढत आहे. त्यामुळे या परिसरात वर्दळही वाढली आहे. केवळ दिवसाच नाही तर रात्रीच्या वेळीही या मार्गाने नागरिकांची ये-जा सुरू असते. रेल्वेपुलानजीकचा एक विद्युतखांब खराब असून केव्हा कोसळेल, याची शाश्वती नाही. रहदारीच्यावेळी विद्युतखांब कोसळल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

Advertisement

हेस्कॉमचे दुर्लक्ष

Advertisement

परंतु, हेस्कॉमकडून विद्युतखांब बदलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याने   नागरिकांचा जीव टांगणीला  लागला   आहे. त्यामुळे या ठिकाणचा विद्युतखांब बदलावा, अशी मागणी रहिवाशांमधून होत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article