महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कॉलेज रोडवरील धोकादायक फांद्या हटविल्या

11:28 AM Aug 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वाहनधारकांना दिलासा, प्रशासनाकडून दखल

Advertisement

बेळगाव : कॉलेज रोडवरील दुभाजकावर असलेली धोकादायक झाडे आणि फांद्या हटवाव्यात, अशी मागणी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली होती. याची दखल घेत तातडीने कॉलेज रोडवरील धोकादायक झाडांच्या फांद्या हटविल्या आहेत. त्यामुळे वाहन धारकांना दिलासा मिळाला आहे. या मार्गावर सतत वाहनांची ये-जा असते. दरम्यान दुभाजकावरील झाडांवर फांद्या वाढल्या होत्या. ये-जा करणाऱ्या वाहन धारकांना याचा धोका निर्माण झाला होता. विशेषत: दुचाकी यासह अवजड वाहनांना त्रासदायक ठरत होत्या. या धोकादायक फांद्यांची छाटणी करावी, अशी मागणी करण्यात आली होती. याची दखल घेत मनपा प्रशासनामार्फत तातडीने फांद्या हटविण्यात आल्या आहेत.

Advertisement

जीर्ण झाडे हटविण्याची मागणी

शहरात धोकादायक झाडे आणि फांद्यांचा प्रश्न पुन्हा पुन्हा ऐरणीवर येऊ लागला आहे. धोकादायक झाडे कोसळून अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर वादळी पावसामुळे सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेची झाडे कोसळून नुकसान होत आहे. त्यावर शहरातील जीर्ण आणि आयुर्मान संपलेली झाडे व धोकादायक फांद्या हटवाव्यात, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article